IMPIMP

Sai Tamhankar On Casting Couch | हिरोसोबत झोपावे लागते, अभिनेत्रीकडे फोन कॉलवर केली मागणी, तिने दिले रोखठोक उत्तर, म्हणाली मग तुमच्या…

by sachinsitapure

मुंबई : Sai Tamhankar On Casting Couch | मिमी, हंटर, भक्षक सह अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून अभिनय केलेली अभिनेत्री सई ताम्हणकर हिने खळबळजनक खुलासा केला आहे. सईने कास्टिंग काउच बाबत वक्तव्य केले आहे. सईने सांगितले की तिला कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे, तिला डायरेक्टर आणि हिरोसाबत तडजोड करण्यास सांगण्यात आले. हे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

सईने मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. सईने म्हटले की काही काळापूर्वी तिला एक फोन कॉल आला होता. एका माणसाने म्हटले की माझ्याकडे एक चित्रपट आहे, परंतु भूमिकेच्या बदल्यात तुला काहीतरी करावे लागेल. तुला दिग्दर्शक आणि निर्मात्यासोबत झोपावे लागेल.

तो मनुष्य म्हणाला, होते तर तसेच की हिरो सोबत झोपावे लागते, इथे तुम्ही आहात म्हणून मी दिग्दर्शक आणि निर्मात्याबाबत बोलतोय.

या माणसाच्या अशा बोलण्यानंतर सईने उत्तर दिले की, मग तुम्ही तुमच्या आईला का नाही पाठवत. तो १० सेकंदासाठी शांत झाला. यानंतर सई म्हणाली, आता तुम्हाला समजले असेल की, तुम्ही मला पुन्हा फोन करू नये. यानंतर मी फोन बंद केला.

सई म्हणाली, मला तसा कॉल पुन्हा आला नाही. मला वाटतं तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर ताबडतोब आवाज उठवला पाहिजे.

सई मिमीमध्ये कृतिका सेननची मैत्रीण म्हणून दिसली होती. तिचे हे काम लोकांना आवडले होते. सईने हिंदी, मराठीसह मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Related Posts