IMPIMP

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांची नावे जाहीर

by sachinsitapure

मुंबई : Vidhan Parishad Election Maharashtra | सर्वपक्षीयांकडून विधानपरिषदेची तयारी सुरु झालेली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी वरिष्ठ नेतृत्वाच्या गाठीभेटी घेणेही वाढले आहे. विधानपरिषदेसाठी भाजपकडून कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला म्हणावे असे यश मिळाले नाही.

मात्र आता आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन विधानपरिषदेसाठी उमेदवार निवडले जातील अशी कुजबुज होती. दरम्यान भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), अमित गोरखे (Amit Gorkhe), परिणय फुके (Parinay Phuke), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नावांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपाकडून सावधरीत्या पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेच्या यादीमध्ये जातीय समतोल राखल्याची चर्चा आहे. मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे.

Related Posts