IMPIMP

Anti Corruption Nashik | 8 लाखाच्या लाच प्रकरणात ZP च्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर फरार?

by nagesh
Anti Corruption Nashik | zilla parishad education officer dr vaishali veer zankar is absconding

नाशिक न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Anti Corruption Nashik | नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर (Education Officer Dr. Vaishali Zankar-Veer) यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Nashik) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (10 ऑगस्ट) रोजी करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेतले. मात्र, रात्री महिला संशयितेस अटक करण्याची पोलिसांची वेगळी पद्धत असून सूर्यास्त झाल्यानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम असल्याने डॉ. वैशाली झनकर-वीर यांना बुधवारी हजर व्हा. अशी हमी देऊन घरी जाण्यास सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात (Police station) झनकर-वीर या हजर झाल्याचं नाहीत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शाळांना शासनाकडून 20 % अनुदान मंजूर झाले होते.
या मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे संस्थेस नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी संस्थेकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात आली.
यावेळी संस्थेकडे सुमारे 9 लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली.
यावेळी तक्रारदार यांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले.
या प्रकरणातील इतर 2 संशयित शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (Pankaj Dashpute) या दोघांना जिल्हा कोर्टात हजर केले आहे.
या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं 13 ऑगस्टपर्यंत (nashik district and sessions court) पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

दरम्यान, 8 लाख रुपयांची लाच शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून स्वीकारल्याच्या कारणातून
नाशिक जिल्हा परिषद (Nashik Zilla Parishad) माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी
डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) ताब्यात घेतले होते.
परंतु, आज त्या पोलिस ठाण्यात (Police station) हजर झाल्या नाहीत.
अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title : Anti Corruption Nashik | zilla parishad education officer dr vaishali veer zankar is absconding

 

हे देखील वाचा :

Police Recruitment – 2019 | पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत वाढ

Weather Update | आगामी 5 दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

Modi Government | मोदी सरकारच्या योजनेत दरमहिना एक रुपया खर्च करून मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या

 

Related Posts