IMPIMP

Pimpri Crime | लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टोळक्याकडून 25 वर्षीय तरुणाची हत्या, माजी शहराध्यक्षासह दोघा जणांना अटक

by nagesh
Pimpri Crime | young man beaten to death by a mob pimpri rpi city chief suresh nikalaje arrested

पिंपरी न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pimpri Crime | एका टोळक्याकडून तरुणाची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पिंपरी (Pimpri Crime) परिसरातील डिलक्स चौकात घडली आहे. वेडा म्हटल्याच्या कारणातून संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर टोळक्यानं काठीनं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानं संबंधित तरुणाचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी पिंपरी येथील माजी शहराध्यक्षासह दोघा जणांना अटक (City chief arrest) करण्यात आली आहे. मनोज राजू कसबे (वय, 25 रा. मिलिंदनगर, पिंपरी) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अधिक माहिती अशी, आरोपींच्या टोळक्याकडून मनोजला (Manoj Kasbe) सतत वेडा म्हणून चिडवलं जायचं.
या रागातून मृत मनोजनं टोळक्याच्या अंगावर धावून जात त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी टोळक्यानंच मनोजला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यातच मनोजचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय, 40), शौकत समीर शेख (वय, 32) (दोघे रा. मिलिंदनगर) यांना अटक करण्यात आलीय.
या मारहाण प्रकरणात पिंपरी शहरातील आरपीआयच्या माजी शहराध्यक्षाचं नाव देखील आलंय.
यांनतर पोलिसांनी पिंपरीतील आरपीआयचे माजी शहराध्यक्ष चिम्या उर्फ सुरेश निकाळजे (Suresh Nikalje arrest) याला ताब्यात घेतलं आहे.

 

 

दरम्यान, मनोजच्या हत्येप्रकरणात अजून माजी शहराध्यक्षासह तिघांना अटक केलीय.
तसेच, मनोज जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल आणि त्यांचे इतर साथीदार अजून पसार आहेत.
याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस (Pimpri Police) करीत आहेत.

 

 

Web Title : Pimpri Crime | young man beaten to death by a mob pimpri rpi city chief suresh nikalaje arrested

 

हे देखील वाचा :

MRNA Vaccine | खूशखबर! कोविडसाठीची एमआरएनए लस कॅन्सरवरही उपयोगी; जर्मन बायोटेक्नॉलॉजी कंपनी बायोनटेकचे संशोधन

Prakash Raj | जेष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात

Small and Retail Traders | छोट्या दुकानदारांसाठी मोठी बातमी! केंद्राने म्हटले, ई-कॉमर्स कंपन्यांकडून होणार नाही नुकसान, जाणून घ्या काय आहे प्लान?

 

Related Posts