IMPIMP

Lonikand Pune Crime | पुणे : गांजा बाळगणारी महिला लोणीकंद पोलीस ठाण्यातून पळाली

by sachinsitapure

पुणे : – Lonikand Pune Crime | विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या महिलेविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कामात व्यस्त असताना महिलेने संधी साधून पोलीस ठाण्यातून धुम ठोकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गायरान वस्ती (Gairan Wasti Wagholi) येथे गांजा विक्री (Ganja Sell) होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर 25 एप्रिल रोजी रात्री उशिरा लोणीकंद पोलीस ठाण्यातील पथकाने याठिकाणी छापा टाकून 1 किलो 329 ग्रॅम गांजा जप्त केला. गांजा बाळगल्याप्रकरणी छकुली राहुल सुकळे (वय-24 रा. वाघोली) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीची वेळ असल्याने महिलेला अटक न करता तिला नोटीस देण्यात आली. 26 एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेला अटक करुन याबाबत नोंद घेण्यात आली. तिला महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास महिला कर्मचारी सीसीटीएनएस कक्षामध्ये काम करत असताना छकुली सुकळे ही नजर चुकवून पळून गेली.

आरोपी महिला पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिचा पोलीस ठाण्याच्या आवारात व परिसरात शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. यानंतर पळून गेल्या प्रकरणी छकुली सुकळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Pune Weather Update | पुणे झाले ‘हॉट सिटी’ ! पुण्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट

Related Posts