IMPIMP

‘महामंडळ, एस.ई.ओ पदाच्या नियुक्त्या जाहीर करा’, नाना पटोले यांना निवेदन

by pranjalishirish
Local Body Elections | congress will contest local body elections on its own Attention to the role of NCP and Shiv Sena

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन 13 महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी झाला आहे. तरीही अद्याप साध्या एस ई ओ व महामंडळ नियुक्त्यादेखील झालेल्या नाहीत. त्यामुळं एसईओ आणि महामंडळ नियुक्त्या त्वरीत करण्यात याव्यात यासाठी मुंबई काँग्रेसचे माजी सचिव धनंजय जुन्नरकर (Dhananjay Junnarkar) यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना निवेदन दिलं आहे.

Girish Bapat : ‘पवारांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य समोर येणार अन् ‘दूध का दूध’, ‘पानी का पानी’ होणार’

धनंजय जुन्नरकर Dhananjay Junnarkar म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही. सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफरास केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणं दुरापास्त वाटत आहे. त्यांना पत्र देऊन व पद रिक्त पाहून एक वर्ष व्हायला आलं आहे.

‘महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी’, संजय राऊतांचे मोठं विधान

पुढं बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्षांची सत्ता आहे. त्यात काँग्रेसला सर्वात कमी वाटा मिळाला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, जोश निर्माण व्हावा हे अत्यंत गरजेचं आहे.

‘जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान’ ! ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर टीका

ते असंही म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांना गेल्या 6-7 वर्षात कोणतीही शासकीय पदे मिळालेली नाहीत. कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात. सर्वांना पक्ष तिकिट देऊ शकत नाही. अशा वेळी चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, वरिष्ठ पदाधिकारी यांना न्याय देण्याची गरज आहे.

खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार

पुढं ते म्हणतात, महाराष्ट्र शासनाकडे 40 महामंडळे असून त्यात 350 ते 400 वरिष्ठ पदाधिकारी आणि एस ई ओ च्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोशात काम करू लागतील व कार्यकर्त्यांना देखील न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवारांनी भाजपला घेरलं !

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी ज्यांची नावं गेली आहेत त्या नावांना महामंडळात सामील करून घेतलं तर त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही असंही जुन्नरकरांनी Dhananjay Junnarkar आवर्जून सांगितलं.

Also Read :

‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

Related Posts