IMPIMP

‘बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरून भाजप मोठी झाली पण आता…’

by bali123
shivsena leader bhaskar jadhav replied bjp over parambir singh letter and sachin vaze case

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरण आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर ठाकरे सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याच प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता शिवसेना shivsena आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर टीका केली. ‘बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरून भाजप मोठी झाली आहे. त्यांनी ही बाब लक्षात ठेवायला हवी, असे ते म्हणाले.

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भास्कर जाधव बोलत होते. ते म्हणाले,  महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रपती राजवटीची वारंवार मागणी केली जात आहे. राज्यात भाजपचे सरकार आले नाही. तर 2024 मध्ये केंद्रात भाजप सरकार येणार नाही. याची भाजपला कल्पना आहे. हीच भाजपची दुखरी नस आहे. याच कारणास्तव भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची वारंवार मागणी केली जात आहे.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

तसेच ‘काही लोकांनी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्याने त्यांनी टाहो फोडला होता. पण त्यानंतरही मुख्यमंत्री झाले नाहीत’, असा टोलाही अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना लगावला.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे अनेकांना पचनी न पडणार आहे. म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भाजप बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरून मोठी झाली आहे. त्यांनीही ही बाब लक्षात ठेवायला हवी. मात्र, भाजप तीच वेल संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

Related Posts