IMPIMP

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

by pranjalishirish
Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis reply on ncp chief sharad pawar statement on gst

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याचे प्रकरण, सचिन वाझेंना अटक, परमबीर सिंह यांचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप, महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा अशा घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  हे आज (बुधवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासंदर्भात ही भेट असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आज किंवा परवा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ब्रिच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शरद पवार सध्या सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबाद येथे भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेमुळे राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादीने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. आता देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  हे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

Related Posts