IMPIMP

‘अनिल देशमुखांवरील ‘त्या’ 100 कोटींच्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळयात निव्वळ धुळफेक’

by pranjalishirish
Sachin Vaze | ed told that has no objection if sachin waze become approver in former home minister anil deshmukh corruption case

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून राज्य सरकारनं 1 एप्रिलच्या आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवलं आहे असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी मुंबई उच्च न्यायालाचे निवृत्त न्यायमुर्ती कैलास चांदीवाल (Kailash Chandiwal) यांची एक सदस्यीस उच्चस्तरीय समिती करणार आहे. मंगळवारी सामान्य प्रशासन विभागानं याबाबत आदेश काढला. यावरून भाजपनं निशाणा साधला आहे.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

‘ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार’

केशव उपाध्ये Keshav Upadhye  म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्राला अनेक दिवस उलटले तरी सरकार ढिम्मच होते. मात्र उच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी होणार हे दिसल्यानंतर राज्य सरकारनं बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती चौकशी आयोग अधिनियम 1952 अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळं या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही. तसंच समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहिलंच पाहिजे असं बंधनही नसेल. त्यामुळं ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार आहे अशी टीका उपाध्ये यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

‘हवा तसा अहवाल तयार करून घेतला जाण्याची शक्यता’

पुढं बोलताना केशव उपाध्ये Keshav Upadhye  म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा गृहमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. असं असताना या विभागाकडे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सोपवली तर ती नि:ष्पक्ष असेल याची अजिबात खात्री नाही. ज्याप्रमाणे महावसुली सरकारनं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल जसा हवा तसा तयार करून घेतला त्याचप्रमाणे आता या चांदीवाल समितीकडून सुद्धा आपल्याला हवा तसा अहाल तयार करून घेतला जाण्याचीच अधिक शक्यता आहे अशी खोचक टीकाही उपाध्ये यांनी यावेळी बोलताना केली.

‘मातोश्री’वर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं?, भाजपची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलताना उपाध्ये म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीबद्दल सुरू असलेल्या चर्चेवरही केशव उपाध्ये यांनी भाष्य केलं. उपाध्ये म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांची भेट झाली की, नाही याविषयी भाजपकडून कुठलंच वक्तव्य केलेलं नाही. या विषयावर सुरूवातीपासूनच कोण बोलत आहे व राज्य सरकार किती ठाम आहे याविषयी वारंवार कोणाला सांगत रहावं लागलं आहे ? त्यामुळं नक्की कोणाचं पित्त खवळलं हे स्पष्ट आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts