IMPIMP

Chandrakant Patil | ‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्याची चुकीची क्लिप व्हायरल, चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडीओ)

by nagesh
Chandrakant Patil | bjp chandrakant patil target deputy cm ajit pawar pune maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुण्यात मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ‘मला माजी मंत्री म्हणू नका’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, त्या वक्तव्याची क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल (Clip viral) करण्यात आली. माजी मंत्री म्हणू नका हे दुसऱ्या नेत्यांसाठी होतं असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच माझ्या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली. माझा असा कोणताही हेतू नव्हता. तसेही एखाद्या वक्तव्याने फारसं नुकसान होत नसेल तर बोला असंही पाटील म्हणाले.

 अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री कि पिंपरी चिंचवडचे

पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधाला. सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काहीही होत नाही. एकाही आमदाराला ते घेऊ शकत नाहीत. या राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे आहेत की पिंपरी चिंचवडचे (Pimpri Chinchwad) हेच समजत नाही. ते कोरोना काळात राज्यात बाहेर कुठं गेले. पिंपरी चिंचवड महापालिका माझ्या नेतृत्वाखाली होणार असं म्हणून त्यांनी स्वत:ला लहान केलं, अशा शब्दंत त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

पक्ष सोडणाऱ्यांना इशारा

फोडाफोडीच्या राजकारणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा काहीही होणार नाही.
तसेच लोकांचे नगरसेवकांवर प्रेम नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर प्रेम आहे.
त्यामुळे जाणाऱ्यांनी विचार करावा. तुम्हाला पुन्हा परतीची वाट नाही, असा इशारा पक्ष सोडणाऱ्यांना त्यांनी दिला.

काँग्रेसचं जहाज बुडालं

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder Singh) यांच्या राजीनाम्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधाला. पंजाबमध्ये (Punjab) काय झालंय पहा. जहाज बुडतं तेव्हा सर्वात शेवटी कॅप्टनने बाहेर पडायचं असतं. आता पंजाबमध्ये कॅप्टनने राजीनामा दिलाय. काँग्रेसचं जहाज बुडालं, असे पाटील म्हणाले.

पवारांचा चेहरा उघड झाला

जीएसटीवरुन (GST) पवारांचा चेहरा उघड झाला आहे. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा हवाय. त्याच्यावर राज्य चालवयाचं आहे. तुम्ही विरोध करता, लखनऊला का गेला नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

Related Posts