IMPIMP

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ने आयोजित केलेल्या ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’ला उदंड प्रतिसाद; पुनीत बालन म्हणाले – ‘कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे’ (Videos)

by sachinsitapure
Punit Balan Group (PBG)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Punit Balan Group (PBG) | मतदाराच्या एका मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा यासाठी कंटेट क्रिएटर्सनी मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे, असे आवाहन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) यांनी केले. (Punit Balan Group (PBG))

This image has an empty alt attribute; its file name is Punit-Balan-Group-PBG-28-1024x718.webp

मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे पुण्यात ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे (One Click On Vote Can Change The World) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्यासह मोठ्या संख्येने कंटेट क्रिएटर उपस्थित होते. सध्या सोशल मिडीयाची (Social Media) ताकद प्रचंड असून तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरीक सोशल मिडियाचा एक भाग बनले आहेत. या ताकदीचा वापर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मिडियातील कंटेट क्रिएटर्सनी सक्रिय योगदान देण्याची गरज असल्याचे मत पुनीत बालन यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘‘सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद होतो. त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात आणि त्यावर उपाययोजनाही करता येतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावी काम करता येते.’’ यावेळी त्यांनी मतदानाबद्दल जागृती करण्याचेही आवाहन केले.

मतदान जनजागृतीसाठी कंटेट क्रिएटर्ससोबत सहभाग घेणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘चित्रपट पोहोचवण्यासाठी क्रियेटर्स यांची भूमिका सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. काही सेकंदाच्या कंटेंटमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम अवघड असते. परंतु कंटेट क्रिएटर्स आपल्या प्रतिभेतून आणि निरीक्षण शक्तीद्वारे हे काम सहज करु शकतात. असेच काम त्यांनी मतदानाबाबत जागृती करण्यासाठी केले तर ते राष्ट्रीय कार्य होईल, यात काही शंका नाही.’’

‘‘सोशल मिडियाच्या माध्यमातून कंटेट क्रिएटर्सनी लोकांमध्ये सकारात्मकता पसरवणे गरजेचं आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती केली तर मतदानाचे प्रमाण वाढेल आणि या मतदानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना देशाच्या विकासाचे भागीदारही बनता येईल. तसेच मतदारांनीही मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून घरी न बसता जागरूक नागरिक म्हणून मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं. तरंच त्यांना सरकारवर बोलण्याचा अधिकार उरेल.’’

* पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

Related Posts