IMPIMP

Keshav Upadhyay | ‘जनतेला लोकलप्रवासाची परवानगी द्या नाहीतर पाच हजार प्रवास भत्ता द्या’ – भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

by bali123
Keshav Upadhye | Rahul instead of Rama in Uddhav Thackeray's politics!, BJP Chief Spokesperson Keshav Upadhyay criticizes

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्य माणसाला लोकल प्रवासाची (Local travel) तत्काळ परवानगी द्यावी अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रु . द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP chief spokesperson Keshav Upadhyay) यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये (BJP chief spokesperson Keshav Upadhyay) बोलत होते. प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी व गणेश हाके यावेळी उपस्थित होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उपाध्ये यांनी सांगितले की, राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा (Suburban railway service) बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतूकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे.

मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला (Shivsena) भरभरून साथ दिली आहे. या
सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला (Mahaaghadi government) जाणीवच
नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने
याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रु. राखून ठेवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच
सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य
माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

Web Titel :  Keshav Upadhyay | Allow people to travel locally or pay Rs 5,000 travel allowance’ – BJP chief spokesperson Keshav Upadhyay

Related Posts