IMPIMP

Maharashtra Band | आघाडीचा बंद हा ‘ढोंगीपणाचा कळस’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | the public should be made servants of the people through people oriented work the police should give justice to every citizen devendra fadanvis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना (Lakhimpur violence) गाडीखाली चिरडून ठार मारले होते. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) तिन्ही पक्षांनी सोमवारी (दि.11) महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) पुकारला आहे. आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर (Maharashtra Band) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस यांनी आघाडीच्या या बंदला ‘ढोंगीपणाचा कळस’ असे म्हटले आहे. या बंदद्वारे सरकारचा ढोंगीपणा उघड झाला असून आजचा बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवाद (Terrorism) आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर या सरकारने आज संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे. अन्यथा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, असेही आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. लखीमपूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद केला जातो. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी (flood victims) मात्र हे सरकार एकही पैसा द्यायला तयार नाही. आज राज्यातील शेतकरी संकटात आहे. आघाडी सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) बांधावर जाऊन 25 हजाराच्या आणि 50 हजाराच्या ज्या काही घोषणा केल्या त्या सर्व घोषणा हवेतच विरलेल्या आहेत. अनेक संकटांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही आणि जरी केली असेल तरी ते अपुरी मदत आहे. यामुळे भाजपचेच सरकार (BJP government) बरे होते असेही म्हटले जात असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

 मावळमधील गोळीबार जालियनवाला बागेचा प्रकार

मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर याच सरकारने गोळीबार (maval golibar) केला होता, असे म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. तो गोळीबार लक्षात घेता गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का ? असा सवालही त्यांनी केला. मावळमध्ये जो गोळीबार झाला तो जालियनवाला बागेचा (Jallianwala Bagh) प्रकार होता, अशी टीका देखील त्यांनी केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दमदाटी करुन लोकांना बंद करायला भाग पाडले

आजचा बंद (Maharashtra Band) संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीच करण्यात आलेला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या बंदला लोकांचा प्रतिसाद नसून प्रशासनाच्या मदतीने दमदाटी करुन पोलिसांचा वापर करुन लोकांना बंद करायला भाग पाडले जात आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

या सरकारचे नाव ‘बंद सरकार’

राज्यात आघाडीचे सरकार आल्यापासून योजना, अनुदान बंद करु लागले आहे.
या सरकारने कोरोना काळात महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) केला.
आता कुठे लहान दुकानदार आणि व्यापाऱ्यांची गाडी रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला आहे.
म्हणून या सरकारचे नावच ‘बंद सरकार’ असल्याचे, फडणवीस म्हणाले.

 

Web Title : Maharashtra Band | bjp leader devendra fadnavis has criticized maharashtra bandh as a mva government sponsored terrorism

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बारामतीमध्ये 34 वर्षीय ऑडिट सुपरवायझरची आत्महत्या

Maharashtra Band | महाविकास आघाडीच्या दुचाकी रॅलीमुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम

Nusrat Jahan Marriage | …अन् नुसरत जहॉंनं दिली प्रेमाची कबूली ! फोटो शेअर करत म्हणाली, झालं दुसरं लग्न..

 

Related Posts