IMPIMP

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

by pranjalishirish
mamata banerjee impoverished bengal during her 10 years power alleges ramdas athavale

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल  West Bengal विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हि लढत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी होणार आहे. तसेच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रचारसभेला सुरूवात केली आहे.

‘महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी’, संजय राऊतांचे मोठं विधान

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळात पश्चिम बंगालला कंगाल केले आहे, अशी टीका रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे. रामदास आठवले हे आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारुकेश्वर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संजीव चक्रवर्ती यांच्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. रामदास आठवले दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे १५ उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. त्या उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यासाठी रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये West Bengal  विधानसभेच्या एकूण २९४ जागापैकी १५ जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर लढत असून २७९ जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असणार आहे.

Girish Bapat : ‘पवारांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य समोर येणार अन् ‘दूध का दूध’, ‘पानी का पानी’ होणार’

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दलितांची लोकसंख्या ३६ टक्के असून दलितांचे मतदान निर्णायक ठरणारे आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने बंगालला कंगाल केले आहे. मात्र आता पश्चिम बंगालला West Bengal  सोनार बंगाल करण्यासाठी येथील दलितांकडून भाजपला पाठिंबा देण्यात येणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यामधील विजयी उमेदवारांचा भाजपला पाठिंबा राहील, अशी घोषणा रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आली आहे.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ६४ आमदारांनी सोडचिट्ठी दिली आहे. तसेच अनेक नेत्यांनीसुद्धा पक्ष सोडला आहे. एखादा पक्ष सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी बाहेर पडण्याचे देशात तृणमूल काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे आता भाजपला पश्चिम बंगालचे सोनार बंगाल करता येणार आहे. पश्चिम बंगालमधील दलित आणि अल्पसंख्यांक भाजपला विजयी करतील. पश्चिम बंगाल West Bengal  च्या विकासासाठी रिपाइं आणि भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांच्याकडून करण्यात आले आहे.

Also Read :

‘जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान’ ! ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर टीका

खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार

रोहित पवारांनी भाजपला घेरलं !

‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts