IMPIMP

‘ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली’, भाजप नेत्याचा घणाघाती आरोप

by pranjalishirish
mansukh hiren assassinated thackerays vaze gang kirit somaiya cm uddhav thackeray

भिवंडी : सरकारसत्ता ऑनलाइन-  भाजपचे नेते किरीट सोमय्या  Kirit Somaiya यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी भिवंडी येथील कोविड लसीकरण केंद्राला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकणावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

कोविड लसीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर किरीट सोमय्या   Kirit Somaiya यांनी पत्रकारांशी बोलताना सांगिलते की, कालच मी हिरेन कुटुंबियांची भेट घेतली. या भेटी दरम्यान हिरेन कुटुंबीय प्रचंड तणावत असल्याचे दिसून आले. ठाकरे सरकारच्या वाझे गँग कडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या दिल्या जात आहे. त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी यासाठी एनआयए व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले असल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली.

वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यामागचा हेतू काय ?

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधताना सोमय्या   Kirit Somaiya म्हणाले, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने 5 जून 2020 रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले. सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यामगाचा नेमका हेतु काय होता याची चौकशी करावी, अशी मागणी देखील आपण एनआयएकडे केली आहे. अशी माहिती सोमय्या यांनी पत्रकारांना दिली.

पोलीस झोपा काढत होते काय ?

दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हिरेन प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप ट्विटद्वारे केला होता. यावर बोलताना सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन सावंत हे हिरेन प्रकरण भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र तुमचे, सरकार तुमचे, पोलीस तुमचे, वाझे पण तुमचाच मग हिरेन प्रकरणात पंधरा दिवस पोलीस झोपा काढत होते काय ? का हे सर्व जण 50 कोटींच्या वसुलीत व्यस्त होते, असा प्रश्न विचारत सोमय्या यांनी आरोप केला आहे. तसेच सचिन वाझे याचा बोलविता धनी लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts