IMPIMP

बिल्डरवर हल्ला केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 10 वर्ष कारावास

by bali123
chhota rajan sentenced ten years jail attempted murder case bookie turned builder ajay goslia

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – आठ वर्षापूर्वी बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया यांचा हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन chhota rajan ला मंगळवारी (दि. 16) मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला 5 लाखाचा दंडही ठोठावला आहे. छोटा राजन chhota rajan सह अन्य आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

28 ऑगस्ट 2013 रोजी बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया (वय 52) याच्यावर मालाडमध्ये तिघांनी गोळीबार केला होता. सुदैवाने गोसालिया या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला होता. छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन हा गोळीबार झाल्याचा सीबीआयचा आरोप होता. सतीश कालिया या आपल्या साथीदारामार्फत छोटा राजनने हल्ला घडवून आणला होता. याप्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. काही दिवसांनी या प्रकरणाचा तपास डीसीबीकडे सोपवण्यात आला. स्पेशल युनिटने सात आरोपींविरोधात नोव्हेंबर 2013 मध्ये आरोपपत्र दाखल केले. प्रकाश निकम, सतीश कालिया आणि छोटा राजन हे तीन आरोपी वाँटेड होते. त्यानंतर पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात निकम आणि कालियाला अटक झाली. छोटा राजनला बालीवरुन भारतात आणल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले होते. 21 एप्रिल 2016 ला सीबीआयने राजला ताब्यात घेतले होते.

NIA नं तपास पूर्ण झाल्यानंतर बोलावं, विनाकारण बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील

 

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts