IMPIMP

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : ‘त्या’ मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो

by pranjalishirish
mansukh hiren death case photo of bjp leader with mercedSachin Vaze es car sachin sawants allegation

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून एनआयए (NIA) च्या टीमनं जी मर्सिडीज गाडी जप्त केली आहे त्या गाडी सोबत भाजप नेत्याचा संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी पुरावे देत फोटोही सोशलवर शेअर केले आहेत. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

सचिन वाझे Sachin Vaze वापरत असलेली एक कार एनआयएला सापडली आहे. या कारमध्ये 5 लाखांची रोकड आणि पैसे मोजणारी मशीन सापडली आहे. परंतु आता या कारमुळं राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. या गाडीसोबत भाजप पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

ज्या दिवशी मनसुख हिरेन mansukh hiren  यांचा मृत्यू झाला, त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज कारमधून प्रवास केला.
ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचे या मर्सिडीज कार सोबत फोटो आहेत.
17 ऑक्टोबर रोजी देवेन शेळके यांची भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती.
याबद्दलचे नियुक्तीपत्र देखील सावंत यांनी ट्विटमध्ये शेअर केलं आहे.
इतकंच नाही तर मनसुख हिरेन mansukh hiren याची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता.
आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

मनसुख हिरेन प्रकरण : CDR वरून काँग्रेसने फडणवीसांना घेरले, म्हणाले…

Related Posts