IMPIMP

राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रामुळं वातावरण तापणार ! छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ‘काका-पुतण्या’ आमनेसामने ?

by sikandershaikh
raj-thackeray-aditya-thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्या जडणघडणीत छत्रपती शिवाजी पार्कला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी पार्कातल्या (chatrapati shivaji park) दोन्ही पक्षांच्या सभांना मोठी गर्दी होते. पक्षांच्या नेतृत्त्वानं याच मैदानावरून अनेकदा विरोधकांना आव्हान दिलं आहे. ठाकरेंनी याच मैदानातून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता या मैदानावरून शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी पार्कच्या नुतनीकरणासाटी मनसेनं पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहिलं आहे.
सीएसआर निधीतून मनसे पार्काचं नुतनीकरण करेल असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

मनसेच्या पत्रात नेमकं काय ?

2012-17 या कालावधीत नाशिक महापालिकेत सत्ता असताना आम्ही सीएसआर निधीतून अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत.
त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी पार्कचं नुतनीकरण सीएसआर निधीतून पूर्ण करू असं पत्र मनसेनं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलं आहे.

पुढं या पत्रात असंही म्हटलं आहे की, आम्ही छत्रपती शिवाजी पार्कात सीएसआर निधीच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प सुरू केला होता.
परंतु 2017 मध्ये बंद झाला. आता महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही.
त्यामुळं आम्हाला सीएसआर निधीतून छत्रपती शिवाजी पार्कचं नुतनीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी.
महापालिकेकडे निधीची चणचण असल्यानं त्यांनी नुतनीकरणाची निविदा प्रक्रिया थांबवावी असंही यात नमूद केलं आहे.

दरम्यान चहल यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं कोणतंही पत्र
आपल्याला मिळालेलं नाही. स्थानिक वॉर्ड ऑफिसरनं निविदा प्रक्रियेला सुरुवात देखील केली आहे.

खास बात अशी की, गेल्या काही दिवसांपासून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) छत्रपती शिवाजी पार्कच्या नुतनीकरण प्रकल्पात लक्ष घातलं आहे.
त्यांनी काही वेळा छत्रपती शिवाजी पार्कला भेट देऊन तिथली पाहणी देखील केली आहे.
तर राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच पालिका अधिकाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी पार्कला (chatrapati shivaji park) जाऊन आले.
त्यांनीही पार्क आणि परिसराची पाहणी करून नुतनीकरण प्रकल्पाबद्दल काही सूचना केल्या होत्या.

Related Posts