IMPIMP

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

by pranjalishirish
mumbai-police-files-fir-in-mp-mohan-delkars-suicide-case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर Mohan Delkar आत्महत्या प्रकरणामध्ये अखेर मुंबई पोलिसांकडून FIR दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा पेटणार आहे. आताच्या अधिवेशनात मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती.अधिवेशनामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून FIR दाखल करण्यात आला आहे. तसेच मंगळवारी मोहन डेलकर Mohan Delkar आणि त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती.

”माझ्या वडिलांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलण्यामागे प्रफुल्ल खेडा पटेल कारणीभूत आहेत. प्रफुल्ल खेडा पटेल दादरा-नगर हवेलीचे प्रशासक आहेत. ते मागच्या १६ ते १८ महिन्यांपासून माझ्या वडिलांना त्रास देत आहेत. माझे वडील अतिशय वरिष्ठ खासदार होते, अनेक वेळा ते निवडून आले होते. १९८९ पासून ते संसदेत सदस्य होते. महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की, डेलकरप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करा,” अशी माहिती मोहन डेलकर यांच्या मुलाकडून देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर Mohan Delkar यांनी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईमधील हॉटेल सी ग्रीनमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर हे ७ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोटसुद्धा लिहिली आहे. या सुसाइड नोटमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. ही नोट गुजराती भाषेमध्ये लिहिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अजून वाढले आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Related Posts