IMPIMP

Narayan Rane | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नारायण राणेंना स्थान नाही; चर्चेला उधाण

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane will run in the high court to avoid action on the adhish bungalow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Narayan Rane | भाजपने (BJP) आज गुरुवारी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी ही घोषणा केली आहे. या जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील काहींची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, डॉ. विनय सहस्रबुद्धे, तसेच चित्रा वाघ यांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र, नुकतंच कॅबिनेट पदावर वर्णी केलेले नारायण राणेंचा (Narayan Rane) यात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

नवी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची यादी आज (गुरुवारी) जाहीर करण्यात आली. त्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 जणांचा समावेश करण्यात आला.
मात्र कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद असून व ज्येष्ठ नेते असून देखील नारायण राणे (Narayan Rane) यांना कार्यकारिणीत स्थान दिलं गेलं नाही.
नारायण राणेंना खासदारकीवरुन केंद्रीय मंत्रीपदापर्यंत वर्णी करण्यात आली.
राणे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं होऊ शकलेलं नाही.
काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांची कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.
असे असतानाही माजी मुख्यमंत्री असलेल्या आणि सध्या कॅबिनेट मंत्री असलेल्या नारायण राणेंना डावललं गेल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण 15 जणांची यादी जाहीर केलेल्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी, संजू वर्मा,
हिना गावित, जमाल सिद्धिकी यांचा समावेश आहे. आधीच्या कार्यकारिणीत असलेले विनोद तावडे, पंकजा मुंडे व सुनील देवधर हेही आहेत. मुनगंटीवार, शेलार व नागवाणी हे विशेष निमंत्रित आहेत.
तर, संजू वर्मा व हिना गावित यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती केलीय. जमाल सिद्धिकी यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

 

Web Title : Narayan Rane | narayan rane have no place in bjps national executive committee

 

हे देखील वाचा :

Kolhapur News | अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी काॅल; कोल्हापुरात मोठी खळबळ

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Osmanabad Crime | संतापजनक ! जात पंचायतीने केले ‘हे’ घृणास्पद कृत्य; संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ

 

Related Posts