IMPIMP

सीताराम गायकर राष्ट्रवादीत ! ‘हा’ धक्का पिचडांना की लहामटेंना ?

by pranjalishirish
ncp give shock to madhukar pitched or lahamate and ajit pawar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांच्यावर टीका करत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर (Sitarama Gaikar) यांना पक्षात प्रवेश दिला. असं करून आपण पिचड यांना धक्का दिला असा आनंद पवार यांना कदाचित झाला असेल. परंतु पवारांनी Ajit Pawar पिचड यांच्यापेक्षाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मतदार आणि पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamate) यांनाच एक प्रकारे धक्का दिला आहे.

गायकरांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादीला फायदेशीर ठरेल की, पिचड यांना ?

राजकारणात नैतिकता आश्वसाने याला काडीचीही किंमत नसते. अजित पवार  Ajit Pawar हे स्वत:ही शब्द पाळणारे नेते नाहीत हे स्वत: त्यांनीच पक्षप्रवेश सोहळ्यातून दाखवून दिलं आहे. त्यामुळं गायकरांचा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादीला फायदेशीर ठरेल की, पिचड यांना ? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं दिसत आहे.

…तर तो अजित पवार यांचा भ्रम ठरण्याचीही शक्यता

अकोले तालुका डाव्या चळवळीचा तालुका आहे. येथील मतदार हे गंमत म्हणून भाषण ऐकत आलेले नाहीत. ते कान आणि डोळे सतत उघडे ठेवत असतात. पवार  Ajit Pawar हे राष्ट्रवादीचे नेते आहेत म्हणून अकोलेकर राष्ट्रवादी सोबत आहेत असं अजित पवार समजत असतील तर तो त्यांचा भ्रम ठरण्याचीही शक्यता आहे. पुरोगामी विचारांमुळं हा तालुका धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणाऱ्या पक्षांसोबत रहात आलेला आहे. त्यामुळं पिचड पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश येथील मतदारांना पटला नाही. त्यांनी पिचड यांना जसं डोक्यावर घेतलं तसंच एका दणक्यात खालीही आपटलं. येथील मतदारांना कुणीही गृहित धरू नये असा संदेश यातून अकोलेनं दिला आहे.

आपल्या जवळ आला की, माणूस नायक बनतो व दूर गेला की खलनायक

हे जनमानस अजित पवार यांना समजलं आहे की, नाही या बाबत साशंकता आहे. कारण तेदेखील अकोलेच्या मतदारांना गृहित धरू लागले आहेत हे गायकर यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातून दिसलं. अजित पवार विधानसभा प्रचारासाठी अकोले येथे आले होते. त्यावेळी सीताराम गायकर यांच्यावर त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. पवारांचं ते वाक्य आजही जिल्ह्याच्या स्मरणात आहे. तेव्हा ते गायकर यांना नागवे करायला निघायला होते. आता मात्र त्यांनीच गायकरांच्या गळ्यात राष्ट्रवादीचं उपरणं टाकलं आहे. यात अजित पवार यांनी आपले शब्द आणि भाषणं यात बदल केला. आपल्या जवळ आला की, माणूस नायक बनतो व दूर गेला की खलनायक बनतो असा मतलबी संदेश यातून अजितदादांनी दिला. यातून त्यांनी गायकर आणि कार्यकर्त्यांचा खूप सन्मान केला असं नाही. पिचड यांच्यावर सूड उगवण्यासाठी त्यांचा त्यांनी वापर केला.

…म्हणून लहामटे हेसुद्धा या पक्षप्रवेश सोहळ्यानं अस्वस्थ असण्याची शक्यता

दरम्यान गायकर आणि त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देताना राष्ट्रवादीनं त्यांचेच आमदार डॉ. किरण लहामटे यांनाही विश्वासात घेतलेलं दिसत नाही. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचाही याला बहुधा विरोधच होता. तशी एक बैठकही पार पडल्याचं समजत आहे. लहामटे यांना अकोले मतदारसंघानं भरघोस मताने विजयी केलं. कारण त्यांची स्वत:ची एक प्रतिमा निर्माण झाली होती. हा मांडवली करणारा आणि पक्षाला शरण जाणार नेता नाही असं लहामटे यांच्याबाबचं जनमत आहे. प्रस्थापित नेत्यांना त्यांनी अंतर राखून दूर ठेवलं होतं. पिचड यांच्याभोवती जो गोतावळा भाजपमध्ये होता त्याचाच लहामटे यांना फायदा झाला. आता हा गोतावळा राष्ट्रवादीत आल्यानं राष्ट्रवादी पुन्हा जुन्या वळणावर जाण्याचा धोका आहे. त्यामुळं लहामटे हेसुद्धा या पक्षप्रवेश सोहळ्यानं अस्वस्थ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गायकर आणि त्यांचा गोतावळा, लहामटे-भांगरे हे राष्ट्रवादीत सख्यानं राहणार का ?

विधानसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत डॉ. लहामटे आणि अशोक भांगरे यांच्यात चुरस होती. यात लहामटे यांनी बाजी मारली. लहामटे आणि भांगरे यांचा आता राष्ट्रवादीतच अंतर्गत संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. अमित भांगरे हेही आता नवीन नेतृत्व म्हणून पुढं येत आहेत. जिल्हा बँकेवर त्यांना संधी देऊन तो संदेश राष्ट्रवादीनं दिला आहे. त्यामुळं पिचड यांना सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले गायकर आणि त्यांचा गोतावळा, लहामटे-भांगरे हे राष्ट्रवादीत सख्यानं राहणार का ? याबाबत शंका आहे. पर्यायानं या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी मजबूत होणार की, डॅमेज ? असा सवालही समोर येत आहे.

गायकर राष्ट्रवादीत का ?

सीताराम गायकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश का केला याला अनेक कंगोरे असल्याचं दिसतं. त्यांचं आणि वैभव पिचड यांचं फारसं सख्य नव्हतं अशी चर्चा आहे. अगस्ती कारखाना ताब्यात ठेवायचा असेल, तर जिल्हा बँक आणि शरद पवार व अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही असा त्यांचा बेत असू शकतो. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात झालेली नोकरभरती कमालीची वादग्रस्त ठरलेली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा गैरफायदा घेत सहकार विभागानं केलेली ही भरती पूर्ववत केली असली तरी भरतीच्या उत्तरपत्रिकांबाबतचा संशयकल्लोळ मिटलेला नाही. गायकर भाजपमध्ये गेल्यानं आधी भाजप सरकार या भरतीबाबत गप्प झालं. आता महाविकास आघाडी देखील मौनात असल्याचं चित्र आहे. या भरती प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी ते सरकारसोबत गेल्याचं म्हटलं जात आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts