IMPIMP

आ. रोहित पवारांची PM मोदींकडे मागणी, म्हणाले – ‘या’ कारणामुळं ‘पेट्रोल-डिझेल’वरील सेस कमी करावा

by sikandershaikh
rohit-pawar-narendra-modi..

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)गेल्या काही दिवसांपासून पेट्रेल-डिझेलच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. काही शहरात पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. इंधन दर कमी करण्यासाठी सतत मागणी होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे.

‘एक्साईज ऐवजी सेस कमी करावा’

रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे. मात्र एक्साईज ऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्यानं विचार करेल, ही अपेक्षा असंही त्यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये पीएम नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅगही केलं आहे.

‘सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता’

या प्रकरणी राज्ये, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत आहे.
दरम्यान केंद्र सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे.
त्यामुळं आता सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रॉयटर्स या न्यूज एजन्सीनं याबाबत माहिती दिली आहे.

इंधनावरील करामुळं राज्यांची किती कमाई ?

केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे 5.56 लाख कोटी रुपये पेट्रोलियम क्षेत्रातून आले आहेत.
31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील ही तिसरी आकडेवारी आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात म्हणजे एप्रिल ते डिसेंबर 2020 या काळात या क्षेत्रातून 4.21 लाख कोटी रुपये केंद्र आणि राज्याच्या तिजोरीत आले आहेत.

तुकोबांचा अभंग म्हणत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा म्हणाले – ‘…येर गबाळ्याचे काम काय’

Related Posts