IMPIMP

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ? सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारची नवी रणनीती

by pranjalishirish
Petrol Diesel Price Hike Pune | Petrol price hike by Rs 10 in 14 days Learn new rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. लवकरच पेट्रोल https://wp.me/pcOJQ9-5fZ शंभरी पार करेल अशी शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या  petrol सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. पेट्रोल, डिझेलच्या करामधून सरकारला मोठा महसूल मिळतो. कोरोनामुळे इतर माध्यमातून मिळणाऱ्या महसुलावर परिणाम झाल्याने सरकार पेट्रोल, डिझेलच्या करात कपात करण्यास तयार नाही. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट ढासळले आहे. आता यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारनं पर्यायांचा विचार सुरू केला आहे.

इंधन उत्पादक देशांकडून सुरू असलेल्या मनमानीमुळे पेट्रोल petrol , डिझेलची दरवाढ होत असल्याचे पेट्रोलियम petrol  मंत्री धमेंद्र प्रधान यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. भारत आपल्या दैनंदिन गरजेच्या 84-85 टक्के इंधन आयत करतो. यापैकी 60 टक्के इंधन हे आखाती देशांतून भारतात मागवलं जाते. या देशांनी इंधनाचं उत्पादन कमी केल्याने इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे या परिस्थीतून बाहेर पडण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार नवी रणनीती आखत आहे.

इंधनाची आयात करताना विविधीकरणाचा विचार करा, असा सल्ला केंद्रानं तेल शुद्धीकरण कंपन्यांना दिला आहे. मध्यपूर्वेतल्या देशांच्या मनमानीला
प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्राने ही रणनीती आखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. देशात इंधन खरेदीबाबतच्या करारासाठी गयाना आणि मेक्सिकोसोबत बातचीत सुरू करण्यात आली आहे. मेक्सिकोकडून 60 लाख टन खनिज तेल खरेदी करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

बहुतांश आखाती देशांची अर्थव्यवस्था ही खनिज तेलावर अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला. याचा परिणाम आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला. आता आखाती देशांनी खनिज तेलाचं उत्पादन कमी केलं आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम खनिज तेलाच्या किमतीवर झाला आहे . खनिज तेलाच्या एका बॅरलचा दर 70 डॉलरपर्यंत पोहोचला आहे. याची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसत आहे.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Related Posts