IMPIMP

Dhananjay Munde On Sharad Pawar | धनंजय मुंडेंनी सांगितल्या पडद्यामागील घटना, नाव न घेत शरद पवारांवर केले आरोप, म्हणाले – ‘दादांना खलनायक केलं’

by sachinsitapure

बारामती : Dhananjay Munde On Sharad Pawar | अजित पवारांबरोबर (Ajit Pawar) अनेक गोष्टी झाल्या. त्याचा मी साक्षीदार आहे. दादांना ज्या पद्धतीने भोगावे लागले त्या पद्धतीने मला देखील अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या. देशांमध्ये गणपती बसले होते. त्याच रात्री जेवणाबरोबर बैठक झाली. भाजपबरोबर जाण्याचे ठरले होते. त्यावेळी जिल्हा मंत्रीपद, पालकमंत्री पद ठरले होते. त्या बैठकीला दादा नव्हते. त्यांना माहितीही नव्हते. पण दादांना खलनायक केले गेले. पुढचा घटनाक्रम सर्वांना माहितच आहे, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

आज इंदापूर (Indapur Sabha) येथे सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे नाव न घेता वरील दावा केला.

धनंजय मुंडे म्हणाले, पुलोदचे सरकार भाजप बरोबर स्थापन केले होते. त्यावेळी ते संस्कार होते का. तुमच्याच सहमतीने २०१९ चा पहाटेचा शपथविधी झाला होता. याबाबत अजित पवार काहीच बोलले नाहीत. पण यामागे शरद पवारच होते.

सर्व गोष्टींबाबत दादांनी कधी ब्र शब्द काढला नाही. दादांना हृदय नाही की भावना नाहीत. तिथे देखील दादांना तोंडावर पाडले. दादा खलनायक झाले. दादांकडे वाकड्या दृष्टीने पहावे ते खलनायक व्हावेत या दृष्टीनेच राजकारण केले गेले, असा आरोप मुंडे यांनी शरद पवारांवर केला.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिवमधील तेर गावातला. मात्र सुनेत्रा वहिनींचे वडील बाजीराव पाटील हे मूळचे बारामती तालुक्यातील वडगावचे. त्या मुळच्या बारामतीच्या, पण तीच लेक सून म्हणून आली की परकी झाली, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

दरम्यान, शरद पवार यांची भाजपासोबत जाण्यास संमती होती, असा दावा सातत्याने अजित पवार गटाकडून केला जात आहे. आता धनंजय मुंडे यांनी तोच दावा पुन्हा केला असला तरी काही नवीन माहिती देखील समोर ठेवली आहे, याबाबत शरद पवारांकडून कोणते उत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Related Posts