IMPIMP

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

by pranjalishirish
rashmi shukla report phone tapping case congress leader sachin sawant raised question to devendra fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा अहवाल आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा हवाला देत भाजप (Bharatiya Janata Party – BJP) नं राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवरून आता काँग्रेसनं थेट भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सवाल केला आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या पेनड्राईव्ह बद्दलही शंका उपस्थित केली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

‘भाजपनं आतापर्यंत जे आरोप केले ते निराधार होते’

पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले, भाजपनं आतापर्यंत जे आरोप केले ते निराधार होते. या प्रकरणाशी महाविकास आघाडी सरकारला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते वेळोवेळी तोंडघशी पडले आहेत. सगळे आरोप खोटे ठरले आहेत. त्यांना याचा सरकारशी कोणताही संबंध जोडता आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनापासून जे आरोप देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  आणि भाजप नेते करत आहेत. त्यात मुद्दे बदलत आहेत. वारंवार ते आरोप बदलत आहेत. पहिला मुद्दा होता अँटिलिया स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या, दुसरा आरोप होता परमबीर सिंह यांचं पत्र आणि तिसरा आरोप केला रश्मी शुक्ला यांनी केलेल्या अहवालाचा.

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला ?’

पुढं बोलताना सावंत म्हणाले, रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं होतं. त्याचा अहवाल त्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये दिला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केला. या तिन्हींचा एकमेकांशी संबंध नाही. वेगवेगळ्या काळात झालेल्या या गोष्टी आहेत. यात परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये. मूळ मुद्दा दुर्लक्षित रहावा यासाठी हे केलं का ? परमबीर सिंह याना कव्हरींग फायर देण्याचा प्रयत्न झाला का ? भाजपची हीच व्यूह रचना होती का ? याच उत्तर काही महिन्यात मिळेल. रश्मी शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलेलं. त्यांनी तो अहवाल ऑगस्टमध्ये दिला. त्याला सात महिने होऊन गेले. तो अहवाल दिल्यानंतर अधिवेशनही झालं. या 6-7 महिन्यात भाजपला आठवण झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला जातोय आणि ते उत्तर देत नाहीयेत. फडणवीस  Devendra Fadnavis यांनी दाखवलेला पेनड्राईव्ह अहवाला सोबत देण्यात आला नव्हता. मग फडणवीसांनी 6.3 जीबीचा कोणता पेनड्राईव्ह दाखवला ? केंद्रीय गृह सचिवांकडे जाऊन त्यांना काय दिलं ? असे सवालही सावंत यांनी केले आहेत.

Also Read

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

Related Posts