IMPIMP

रामदास आठवले ‘गो दीदी गो’च्या पवित्र्यात, पश्चिम बंगालमध्ये देणार ममता दीदींना टक्कर

by pranjalishirish
rpi-to-contest-15-20-seats-in-west-bengal-assembly-election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. भाजपने या निवडणुकीत मोठी मोर्चेबांधणी केली आहे, तर विरोधक भाजपला रोखण्यासाठी एकवटल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच आता केंद्रातील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) पश्चिम बंगालमध्ये होत असलेली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले Ramdas Athawale यांनी आज (शुक्रवार) मुंबईत आरपीआय पश्चिम बंगालमध्ये 15 ते 20 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

रामदास आठवले Ramdas Athawale यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये भाजपला पाठिंबा राहील. पश्चिम बंगालच्या जनतेला बदल हवा आहे, हे लक्षात घेऊन ते म्हणाले की, भाजप आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणार आहे. पश्चिम बंगालची परिस्थिती पाहता मला असे वाटते की, भाजप सत्तेत येईल. ममता बॅनर्जी दहा वर्षे सत्तेत आहेत. आता लोकांना बदल हवा आहे. आरपीआय 15 ते 20 जागा लढवणार असून, भाजपला पाठिंबा देणार आहे.

बुधवारी ममता बॅनर्जी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आल्या असता, त्यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाला. यावर बोलताना रामदास आठवले Ramdas Athawale म्हणाले, तृणमूल काँग्रेसने कथित कट रचला असावा अशी शंका येते. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर कधी हल्ला झाला नाही. आताच असा हल्ला होणे हे कठीण असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर कोणी हल्ला केला किंवा करवून घेतला हे माहीत नाही. मात्र याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात कोणतेही राजकारण असेल असे मला वाटत नाही. त्यांच्यावर यापूर्वी कधीच हल्ला झाला नव्हता. आता कोणी असं करू शकतं, असा प्रश्न रामदास आठवले यांनी उपस्थित केला. रामदास आठवले Ramdas Athawale यांनी मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये कोविड-19 प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांनीदेखील लस घेतली.

Also Read : 

SpiceJet च्या प्रवाशांनो, आता फक्त 299 रुपयांत करा कोरोना टेस्ट तेही घरबसल्या !

Related Posts