IMPIMP

West Bengal Legislative Assembly Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा !

by sikandershaikh
shivsena and congress | congress mohammed arif naseem khan election petition against shiv sena mla dilip lande uddhav thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Legislative Assembly Election 2021) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी तृ्णमूल काँग्रेस (All India Trinamool Congress – TMC) विरुद्ध भाजप (Bharatiya Janata Party – BJP) अशी थेट लढत या निवडणुकीत होणार आहे. गेल्या काही महिन्यात टीएमसीचे काही नेतेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं टीएमसीच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे. तेथील राजकारणही चांगलंच तापलं आहे. अशात आता या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महत्त्वाची घोषणा केली आहे.

शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Legislative Assembly Election) मध्ये काही जागा लढवल्या होत्या. यानंतर आता शिवसेना (Shiv Sena) पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद आजमावून पाहणार का अशा चर्चांनी जोर धरला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबद्दल आता एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर याबद्दलची अपडेट मी तुम्हाला देत आहे.

पुढं बोलताना राऊत म्हणतात, सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळं बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत असंही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (West Bengal Legislative Assembly Election 2021)

प. बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात विधानसभा निवडणूक

1) पहिला टप्पा – 27 मार्च मतदान
2) दुसरा टप्पा – 1 एप्रिल मतदान
3) तिसरा टप्पा – 6 एप्रिल मतदान
4) चौथा टप्पा – 10 एप्रिल मतदान
5) पाचवा टप्पा – 17 एप्रिल मतदान
6) सहावा टप्पा – 22 एप्रिल मतदान
7) सातवा टप्पा – 26 एप्रिल मतदान
8) आठवा टप्पा – 29 एप्रिल मतदान

Related Posts