IMPIMP

‘सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजप बंगालमध्ये आली, पण बोहल्यावर बसणारा नवरा कोण ?’

by sikandershaikh
tejashwi yadav says bjp dont have any leader to fight against mamata banerjee in west bengal

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी पुन्हा एका भाजप (Bharatiya Janata Party – BJP) वर निशाणा साधला आहे. सध्या ते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या (West Bengal Legislative Assembly Alection) पार्श्वभूमीवर प. बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मंत्र्यांची वरात घेऊन भाजप बंगालमध्ये आली, पण बोहल्यावर बसणारा नवरा कोण?

तेजस्वी यादव म्हणाले, भाजप इतका मोठा पक्ष आहे. सर्व केंद्रीय मत्र्यांची वरात घेऊन भाजप बंगालमध्ये आली आहे. मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचं नाव सांगून दाखवा. ज्यांना विधानसभेचा अनुभवच नाही त्यांच्याकडे सत्ता सोपवणार का असा सवालही तेजस्वी यांनी केला आहे. भाजपकडे बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाचा एकही उमेदवार नसल्याचं सांगत तेजस्वी यांनी भाजपवर टीका केली आहे.

‘बिहारचं सध्याचं सरकार हे चोर दरवाज्यातून आत आलंय’

बिहार निवडणुकांबाबत बोलतना तेजस्वी यादव म्हणाले, आम्ही हरलो नाही, तर आम्हाला हरवण्या आलं. बिहारचं सध्याचं सरकार हे चोर दरवाज्यातून आत आलं आहे. बिहारच्या जनतेला हे चांगलंच माहिती आहे असंही त्यांनी सांगितलं.

युतीच्या चर्चा असतानाच तेजस्वी यादव (tejashwi yadav) यांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट

दरम्यान प. बंगाल निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress – TMC) सोबत
युती करण्याच्या चर्चा असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी तृणमूलच्या
अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाब कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
परंतु निवडणुकीत युती बाबत दोन्ही नेत्यात चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Related Posts