IMPIMP

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

by pranjalishirish
telangana 30 percent salary hike announced Government employees cm kcr

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-  तेलंगणा सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना Government employees आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने 9 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तब्बल 30 टक्क्यांची घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. याशिवाय सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय देखील 58 वरुन 61 केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी (दि.22) विधानसभेत ही घोषणा केली. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

हा निर्णय मे 2018 मध्ये निवृत्त आयएएस अधिकारी सी आर बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या आयोगाच्या शिफारशी नंतर घेण्यात आला आहे. सोमवारी विधानसभेत 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या 11th Pay Revision Commission च्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी तेलंगणा सरकारने 2014 मध्ये Pay Revision ची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने 43 टक्क्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याची घोषणा केली होती.

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना महामारीचे संकट सगळ्यांसाठी अडचणीचे ठरले. या काळात देशासह राज्याची अर्थव्यवस्था कमकूवत झाली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात उशीर झाला. आता परिस्थिती काहीशी सुधारली आहे. ही पगारवाढ सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Government employees लागू असणार आहे. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युटीची रक्कम देखील 12 लाखांवरुन 16 लाख करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

तेलंगणामध्ये 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या Government employees  निवृत्तीच्या वयात बदल करणार असल्याची घोषणा केली होती. याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे म्हटले होते. सध्या तेलंगणामध्ये 9.17 लाख सरकारी कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 30 टक्क्यांनी घसघशीत वाढ होणार आहे. आतापर्यंत ही वेतन वाढ फक्त सामान्य कर्मचाऱ्यांना मिळत होती. मात्र, आता कॉन्ट्रॅक्ट आणि आऊटसोर्सिंगवर काम करणारे कर्मचारी, होमगार्ड्स, अंगणवाडी कर्यकर्ते आशांना देखील याचा फायदा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Also Read :

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

…म्हणून फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

Related Posts