IMPIMP

Nitin Gadkari in Loksabha : स्क्रॅप पॉलिसीमुळे होणार फायदाच, वाहने होणार 40 टक्क्यांनी ‘स्वस्त’

by pranjalishirish
vehicle cost 40 percent less because scrap policy said nitin gadkari lok sabha today

नवी दिल्ली : देशात स्क्रॅप पॉलिसीमुळे स्क्रॅपिंग सेंटर्समध्ये वाढ होणार आहे. स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे प्रदूषण कमी होणार आहे. वाहनांच्या खर्चातही 40 टक्क्यांपर्यंत बचत होण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी दिली. याशिवाय या स्क्रॅप पॉलिसीमुळे वाहनांच्या किमती कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रिपद?

लोकसभेत नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे प्रदूषण कमी होणार आहे. वाहनांच्या खर्चातही 40 टक्क्यांपर्यंत बचत होण्यास मदत मिळणार आहे. तांबे, ऍल्युमिनियम आणि रबर यांसारख्या रिसायकललिंगला चालना मिळणार आहे. कंपन्यांना कच्चा मालही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनांच्या उत्पादनाचा खर्च 40 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. स्क्रॅप पॉलिसीमध्ये रिसायकलिंग चालना मिळाल्यामुळे त्यांचा खर्च कमी होणार आहे. त्याचबरोबर जगात त्यांची उत्पादने अधिक स्पर्धक बनतील, असेही ते म्हणाले.

अधिकारी बनलेल्या उमेदवारांचा राज्य सरकारला सवाल, … मग नियुक्त्या का थांबल्या?

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल. त्यानंतर दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती सध्याच्या पेट्रोल-डिझेलच्या वाहनांप्रमाणेच होईल, असा अंदाजीही त्यांनी व्यक्त केला. सध्या देशात 81 टक्के लिथियम आयन बॅटरी तयार होतील. या सर्व ‘मेक इन इंडिया’ असतील. स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यास येत्या 5 वर्षांत देश ऑटोमोबाईलचा हब बनेल. प्रत्येक जिल्ह्यात वाहनांचा फिटनेस तपासण्यासाठी फिटनेस आणि पोल्यूशन सेंटर उभारले जाणार आहेत.

संजय राऊत यांना भाजपचा इशारा; ‘चुकीची कामे केली तर…’

सर्वसामान्यांना होणार फायदा

जुन्या वाहनांमुळे जास्त प्रमाणात प्रदूषण होत असते. ते फिट वाहनांच्या तुलनेत 10 ते 12 टक्के जास्त प्रदूषण करतात. त्यानंतर या स्क्रॅपिंग पॉलिसीचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. तसेच प्रदूषण कमी होईल आणि खर्चही वाचणार आहे, असेही नितीन गडकरी Nitin Gadkari म्हणाले.

Also Read :

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts