IMPIMP

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

by pranjalishirish
Whom did Param bir Singh meet in Delhi after his transfer? - NCP

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. 100 कोटींच्या वसुलीबाबतचा दावाही त्यांनी केला होता. देशमुख पोलीस अधिकाऱ्याला भेटल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य करत मोठा खुलासा केला होता. परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोना (COVID-19) मुळं नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळं त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं पवार म्हणाले होते. या सगळ्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंग Param Bir Singh  यांच्यावर निशाणा साधत त्यांनी अनेक आरोप केले आहेत.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

‘देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार जे आरोप करत आहेत ते खोटे आहेत’

अनिल देशमुख यांचं पोलीस अधिकाऱ्याला भेटणं आणि त्यांनी पत्रकार परिषद घेणं हे आरोप मलिक यांनीही फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) जे आरोप करत आहेत ते खोटे आहेत. अनिल देशमुख यांना 15 फेब्रुवारी रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा हॉस्पिटलबाहेर काही पत्रकार होते. त्यांना देशमुखांशी बोलायचं होतं. देशमुखांना अशक्तपणा जाणवत असल्यानं त्यांनी एक खुर्ची घेतली आणि तिथं बसले. तेव्हा पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असं स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी यावेळी दिलं.

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ते दिल्लीत गेले, तिथे ते कोणाला भेटले हे आम्हाला माहिती आहे, करेक्ट वेळ आल्यावर…’

पुढं बोलताना मलिक म्हणाले, देशमुख यांनी कोणतीही पत्रकार परिषद बोलावली नव्हती. त्यांनी चार्टर्ड फ्लाईटनं मुंबई गाठली आणि घरी 27 तारखेपर्यंत क्वारंटाईन झाले असंही मलिक यांनी सांगितलं. दरम्यान परमबीर सिंग Param Bir Singh यांनी केलेले आरोप आणि सीबीआय चौकशीची मागणी यावर बोलताना मलिक म्हणाले, जेव्हापासून त्यांची बदली झाली आहे, तेव्हापासून ते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. ते असं का करत आहेत हे आम्हालाही माहिती आहे. ते दिल्लीला गेले. तिथे ते कोणाला भेटले हे देखील आम्हाला माहिती आहे. आम्ही योग्य वेळ आल्यावर सांगणार आहोत. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. करेक्ट वेळ आल्यावर सारं उघड केलं जाईल असा इशारा देखील नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना दिला.

Also Read :

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

…म्हणून फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

Related Posts