IMPIMP

Aba Bagul | रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात आता आबा बागुल उतरणार, नाना पटोलेंच्या भेटीनंतर नाराजी झाली दूर

by sachinsitapure

पुणे : Aba Bagul | पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्याने बागुल नाराज झाले होते. आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) भेटीनंतर आबा बागुल यांची नाराजी दूर झाली असून ते धंगेकरांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

आबा बागुल हे पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha) इच्छूक असताना पक्षाने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. यानंतर बागुल यांनी पक्ष कार्यालयात आंदोलन करून आपली नाराजी उघडपणे मांडली होती. पक्षात नवीन आलेल्याना तिकीट दिले जाते आणि चाळीस वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाहीत. ही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांची हत्या आहे, असे बागुल यांनी म्हटले होते.

या नाराजीच्या काळातच आबा बागुल यांनी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि एकच खळबळ उडाली. बागुल भाजपामध्ये जाणार अशी चर्चाही त्यावेळी सुरू झाली होती. यानंतर दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची एकच धावपळ उडाली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बागुलांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली होती. तसेच धंगेकरांच्या प्रचारात सहभागी होण्याची विनंती देखील केली होती. तरी देखील बागुल हे धंगेकरांच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते. आता नाना पटोले यांच्या भेटीनंतर बागुल यांची नाराजी दूर झाली आहे.

याबाबत आबा बागुल म्हणाले की, माझी कुठलीही नाराजी नव्हती. उमेदवार जाहीर झाल्यांनतर माझे म्हणणे पक्ष श्रेष्टींकडे मांडायचे होते. नाना पटोलेंनी माझ्या शंकांचे निरसन केले. आम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी आहोत. पर्वती मतदार संघ काँग्रेसकडे घेऊ असे त्यांना आम्ही सांगितले आहे.

आता काँग्रेसने निवडलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा आम्ही प्रचार करणार आहोत. रवींद्र धंगेकर आजच विजयी झाले आहेत. फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता बागुल म्हणाले, मी वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतली होती.

Rape Case Pune | पुणे : विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करुन खासगी फोटो केले व्हायरल, दोघांवर FIR

Related Posts