IMPIMP

Rajendra Pawar On Ajit Pawar | अजित पवारांवर राजेंद्र पवारांची बोचरी टीका, धरण, पहाटे आणि दुपारचा शपथविधी, आता रात्रीचा कोणता कार्यक्रम…

by sachinsitapure

पुणे : Rajendra Pawar On Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणूक यावेळेस संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. नणंद सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध भावजयी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा सामना येथे होत आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या अजित पवारांविरूद्ध संपूर्ण पवार कुटुंब उभे ठाकले आहे. अजित पवार यांच्यावर सर्वच पवार अगदी तिखट शब्दात प्रहार करत आहेत. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

राजेंद्र पवार यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणातील मुत्रविसर्जनाचा उल्लेख केला आणि आमची मान खाली गेली. अजित पवारांनी सकाळचा शपथविधी केला आणि आमची मान खाली गेली. दुपारचा शपथविधी केला आणि आमची मान खाली गेली. आता रात्रीचा कोणता कार्यक्रम दाखवणार आहेत माहित नाही, अशा बोचऱ्या शब्दात राजेंद्र पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

राजेंद्र पवार यांनी म्हटले की, बारामतीच्या विकासात सर्वच पवार कुटुंबाचा वाटा आहे. रोहित पवारांना जरी अटक झाली तरी आपण शरद पवारांची साथ सोडणार नाही, असा निर्धार देखील राजेंद्र पवार यांनी केला. ते पुढे म्हणाले, अजित पवार म्हणतात की, मीच काम केले तर ते तसे नाही. १९४० पासून माझ्या आजीने या भागात काम केले. घरात सामाजिक आणि राजकीय वातावरण होते.

इतर पवार कुटुंबिय निवडणूक झाली की परदेशात जातील, मीच तुमचा विकास करण्यासाठी तुमच्या सोबत असणार आहे, असे अजित पवार म्हणाले होते, यावर प्रत्युत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले, अजित पवारांना म्हणतात पावसाळ्यात छत्र्या उगवतात. त्यांना माहीत नाही आम्ही सगळ्या सीझनमध्ये इथेच असतो.

राजेंद्र पवार म्हणाले, ते बोलतात ते मनाला लागत नाही. त्यांचा दमदाटी करणे हा स्वभाव. ते आवाजाचा दुरुपयोग करतात. धमकावले की उपयोग होतो, हे भाजपचे धोरण त्यांनी घेतले आहे. संघर्ष नको म्हणून आम्ही तिकडे लक्ष देत नव्हतो. जिथे आपण काय केले नाही तर काळजी का करायची?, असे राजेंद्र पवार म्हणाले.

Related Posts