IMPIMP

Ajit Pawar On Shriniwas Pawar | अजित पवार यांनी बंधू श्रीनिवास पवारांना दिले प्रत्युत्तर, बाबा तूच वस्तरा घेऊन ये, आणि…

by sachinsitapure

पुणे : Ajit Pawar On Shriniwas Pawar | बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha) आज मतदान होत आहे. येथे नणंद-भावजयी असा सामना असला तरी जुगलबंद मात्र अजित पवार विरूद्ध शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), रोहित पवार (Rohit Pawar) आणि सर्व पवार कुटुंबिय (Pawar Family) अशी सुरू आहे. त्यातच अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील. काटेवाडीत मतदान (Katewadi Polling Station) केल्यानंतर अजित पवारांनी आज श्रीनिवास पवारांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले.

श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि काढ मिशा. तसेच श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आईही पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्याचे म्हटले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात असल्याचे दाखवले. माझी आई सगळ्यात जेष्ठ आहे.

माझी आई माझ्याबरोबर आहे. माझी आई कोल्हापूरला होती. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईन. माझी आई माझ्याबरोबर आहे. आमचे कुटुंब फार मोठे आहे. आमच्या विरोधात फक्त तीन कुटुंब आहेत, बाकी कुणी माझ्याविरोधात नव्हते, असे अजित पवार म्हणाले.

कुटुंबावर बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबात सगळ्यात ज्येष्ठ माझे वडील अनंतराव पवार होते. आज माझी आई माझ्या बरोबर आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. आज आम्ही मतदान केले. महायुतीचा उमेदवार यावा या दृष्टीने प्रचार केला होता.

माझ्या विरोधात आरोपांचा धुरळा उठवला. मी लक्ष दिले नाही. माझ्या शेवटच्या सभेपर्यंत बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. आता अंतिम गोष्टी मतदारांच्या हातात आहेत. आज मतदान आहे. आम्हाला विश्वास आहे की बारामतीत केलेले काम आणि नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत केलेले काम हे बारामतीकर लक्षात घेतील. जनता मला साथ देईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Related Posts