IMPIMP

Ajit Pawar On Sunanda Pawar | ‘आमच्या योग्यतेच्या व्यक्तीच्या प्रश्नांना उत्तर देईन’, आईविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याने रोहित पवार संतापले, म्हणाले…

by sachinsitapure

पुणे : Ajit Pawar On Sunanda Pawar | बारामतीत (Baramati Lok Sabha) दहशत आहे, येथे धनशक्तीचा वापर होणार आहे, असे वक्तव्य रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही. आमच्या योग्यतेच्या व्यक्तीच्या प्रश्नांना उत्तर देईन. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार संतापले असून त्यांनी एक्सवर पोस्ट करून अजित पवारांना सुनावले आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बारामतीत दहशतीचं वातावरण असल्याच्या आईच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन असं अजितदादा म्हणाले…बरोबर आहे दादा तुमचं… स्वतःच्या अंगावर आलं की भलतीकडं ढकलण्याचा तुम्हाला भाजपाचा संगतगुण लागलाय.

या पोस्टमध्ये अजित पवारांचे सहकारी नेत्यांवर निशाणा साधताना रोहित पवार यांनी पुढे लिहिले आहे की, आजवर तुमचा प्रचार केला त्यावेळी आम्ही योग्यतेचे होतो. पण आज नाही. मिर्चीवाले… महाराष्ट्र सदनवाले… सिंचनवाले… एकाच वेळी दोन-दोन घरं सांभाळणारे… आदिवासी विद्यार्थ्यांच्या दुधातली मलई खाणारे… मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जेवणाचं ताट पळवणारे… हे मात्र तुमच्या लेखी योग्यतेचे आहेत, अशा परखड शब्दात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले आहे.

दरम्यान, बारामतीची लोकसभा निवडणूक सध्या देशात चर्चेचा विषय झाली आहे. एकाच कुटुंबातील नणंद-भावजयी एकमेकाविरुद्ध लढत आहेत. मात्र, अजित पवारांना दूर करून सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अख्खे पवार कुटुंब मैदानात उतरल्याचे दिसत आहे

Ravindra Dhangekar | वडगाव शेरी व कोथरूड पदयात्रांमध्ये रवींद्र धंगेकरांना मोठा प्रतिसाद

Related Posts