IMPIMP

Ravindra Dhangekar | वडगाव शेरी व कोथरूड पदयात्रांमध्ये रवींद्र धंगेकरांना मोठा प्रतिसाद

by sachinsitapure

पुणे: Ravindra Dhangekar | पुणे लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार सायंकाळी कोथरूड (Kothrud Vidhan Sabha) आणि शुक्रवार सकाळी वडगाव शेरी (Vadgaon Sheri Vidhan Sabha) येथे झालेल्या जीपयात्रा / पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोथरूड विधानसभा मतदार संघातील पदयात्रा पाषाण (Pashan) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यावेळी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पदयात्रा संपूर्ण पाषाण, औंध, बालेवाडी, बाणेर भागांतून नागरिकांच्या भेटी घेत औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळायेथे समाप्त झाली. मार्गातील भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, शंकर मंदिर आदी मंदिरांमध्ये धंगेकरांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतेले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. व्यापारांपासून सर्वसामन्य नागरिकांपर्यंत अनेक जण धंगेकरांशी हस्तांदोलन करून सेल्फी घेत होते.

 

या रॅलीचे मार्गदर्शन व सूत्रसंचालन रवींद्र माझीरे यांनी केले या रॅलीमध्ये शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक चंदू शेठ कदम नगरसेवक पृथ्वीराज सुतार, तानाजी निम्हण, दत्ता जाधव, संतोष तोंडे, शैलेश कदम, संजय निम्हण,आम आदमी पक्षाचे अमोल मोरे, यशराज पारखी, जीवन चाकणकर मंगेश निम्हण,तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी या पक्षाचे महिला व पुरुष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात सकाळी लोहगाव मधील श्रीराम स्वीट होम येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. तेथून पुढे गुरुद्वारात दर्शन घेऊन शीख बांधवांशी धंगेकरांनी चर्चा केली, तसेच संपूर्ण परिसरात नागरिकांच्या भेटी घेऊन ‘पुण्याच्या विकासासाठी’ काँग्रेसला मत द्या असे आग्रह करून सांगितले त्याला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. दोन्ही पदयात्रांमध्ये काँग्रेस पक्षा बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आम आदमी पार्टी व इतर मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पक्षांचे झेंडे, घोषणा, ढोल – ताशा यामुळे वातावरण निवडणूकमय झाले होते.

 

या पदयात्रेत वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, काँग्रेस ब्लॉक उपाध्यक्ष योगेश शिर्के, रामेशमामा खांदवे, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, माजी नगरसेवक संगीता देवकर, माजी नगरसेवक सुनिल मलके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष वडगाव शेरी युवक अध्यक्ष सागर खांदवे, वडगाव शेरी महिला ब्लॉक अध्यक्ष शिवानी माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कविता आम्रे, काँग्रेस प्रभाग क्र १ अध्यक्ष अमोल लोणार, काँग्रेस प्रभाग क्र २ अध्यक्ष डॉ. रमाकांत साठे, दिलीप डाळींबकर आदी सहभागी झाले होते.

Pune Crime News | पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकारात हाणामारी, पत्रकारावर FIR

Related Posts