IMPIMP

Ajit Pawar On Supriya Sule | अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना इशारा

by sachinsitapure

पुणे : Ajit Pawar On Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Lok Sabha) आज शेवटचा दिवस असल्याने महायुतीच्या उमेदवार (Mahayuti Candidate) सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवारांनी प्रचारसभांचा धडाका लावला असून ते सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. आज भोर येथील सभेनंतर अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील (Daund Sabha) वरवंड येथील सभेत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.

वरवंड दौंड येथे काल शरद पवार यांची देखील सभा झाली होती. आजच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी काल सुप्रिया सुळेंसह विविध नेत्यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, कोण मायचा लाल दौंड, बारामती, इंदापूरचं पाणी आडवतो ते मी पाहते, असं काल कोणीतरी बोललं. अगं पण तिथं पाणीच नाही तर काय पाहते? अरे यांना काही माहिती नाही. आम्ही सगळी कामं करायचो.

या राहुल कुल यांना विचारा, किती टीएमसीची धरणं आहेत, किती पाणी पुण्याला प्यायला जातं, किती पाणी शिल्लक राहतं? पाणीच शिल्लक नाही तर कोण अडवणार? अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका, अशी टीका अजित पवारांनी केली.

अजित पवार म्हणाले, मी तर ठरवले आहे या भावकीवर बोलायचेच नाही. त्यांचे त्यांना लखलाभ. काही बोलले तर थोडावेळ लोकांना बरे वाटेल, पण त्यातून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. तुमच्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठी राज्याचा पैसा आणला पाहिजे, केंद्राचा पैसा आणला पाहिजे. बुडीत बंधारे बांधले पाहिजेत. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पक्षाकडून महेश भागवत निवडणूक लढवत आहेत, त्यांनी माघार घेण्यासाठी अजित पवारांनी मनधरणी केली. पण त्यांनी ऐकले नाही, याबाबत अजित पवार म्हणाले, तुमच्या तालुक्यातील एक उमेदवार उभे आहेत. मी त्यांना सांगून दमलो, पण त्यांच्या अपेक्षा खूप होत्या.

त्यांना मी सांगितले की बँकेचा संचालक बनवतो, चेअरमन बनवतो, महामंडळ देतो, कॅबिनेट मंत्रि‍पदाचा दर्जा देतो. पण ते म्हणाले मला राज्यसभेचा खासदार करा. मग मी म्हटले की, हे आपल्या डोक्याच्या पलीकडचे आहे, असे म्हणत अजित पवारांनी महेश भागवत यांची खिल्ली उडवली.

Related Posts