IMPIMP

Ajit Pawar | शैक्षणिक कर्जात वाढ, विद्यार्थ्यांना मिळणार 30 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | students will get a loan of up to 30 lakhs for education ajit pawar pune district cooperative bank pdcc bank

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank) संचालक बोर्डानं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जात (Student Education Loan) वाढ करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. यामध्ये आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 30 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. यापूर्वी हे कर्ज 15 लाख रुपये मिळत होते, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी 40 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज 25 लाखापर्यंत मिळत होते, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, देशात महागाई (Inflation) खूप वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संचालक बोर्डानं (Board of Directors) शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ते पुढे म्हणाले, गृह कर्जात (Home Loan) देखील वाढ करण्यात आली आहे. गृहकर्जाची मर्यादा 75 लाख करण्यात आली असून व्याज दर 8 टक्के असणार आहे. याआधी ते व्याज 9 टक्के होते. जिल्हा बँकेकडून पगारदारांना देण्यात येणारे कर्ज आता 20 लाख रुपयापर्यंत देणार आहे. आधी ही मर्यादा 15 लाख होती. वीस लाखांहून अधिक रक्कमेची ज्या संस्थांना अडचण असेल अशा 13 तालुक्यातील 109 संस्थाना नऊ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं.

 

बोर्डाकडून शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वाहनाच्या कर्जाबाबत (Vehicle Loan) देखील निर्णय घेतला आहे.
वाहनासाठी कर्ज मर्यादा दोन लाखांहून पाच लाख करण्यात आली आहे. तर व्याजदर 10.5 टक्यांवरुन 10 टक्के करण्यात आला आहे.
नोटबंदीच्या कालावधीतील 22 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) अद्याप स्वीकारलेले नाहीत.
यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) खटला सुरु आहे.
राज्यातील वेगवेगळ्या बँकांची अशी रक्कम 90 – 100 कोटी रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  Ajit Pawar | students will get a loan of up to 30 lakhs for education ajit pawar pune district cooperative bank pdcc bank

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने घेतले पेटून

Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांच्या ट्विटनंतर दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं…

Jalgaon Crime | धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ‘सैराट’ ची पुनरावृत्ती अल्पवयीन भावाने बहीण व तरुणाचा केला खून

 

Related Posts