IMPIMP

Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | आव्हान स्वीकारून अमोल कोल्हेंनी दिले पुरावे, पण आता आढळराव म्हणतात ”आरोप आणि पुराव्यांचा संबंध…” (Video)

by sachinsitapure

पुणे : Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | पंधरा वर्षांच्या खासदारकीच्या काळात आढळरावांनी संसदेत संरक्षणाचेच प्रश्न अधिक विचारले आणि स्वःताच्या कंपनीचे हित साधले, असा आरोप शिरूरचे (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला होता. यावर आढळरावांनी पुरावे द्या अन्यथा निवडणुकीतून बाहेर पडा, असे आव्हान दिले होते. आता कोल्हे यांनी पुरावे दिले असता, आढळरावांनी पुरावे आणि आरोपाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटले की, कोल्हेंनी माझ्यावर सॉफ्टवेअरशी संबंधित आरोप केले आणि पाणबुडीचे पुरावे सादर केले. त्यामुळे आरोप आणि पुराव्यांचा दुरान्वये संबंध नाही. शिवाय सादर केलेल्या पुराव्यांवर आठ खासदारांची नावे आहेत. म्हणजे आम्ही आठ खासदारांनी गँग करून हे प्रश्न विचारले का? असा सवाल आढळरावांनी केला.

दरम्यान, कोल्हे मला आव्हान-प्रतिआव्हानामध्ये गुंतवून ठेवण्याचा डाव करतायेत. त्यामुळे यापुढे मी कोल्हेना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका आढळरावांनी घेतली होती. यावर अमोल कोल्हे यांनी म्हटले की, आढळरावांनी सरड्या पेक्षा पटकन रंग बदलला. त्यांच्या या भूमिकेने सगळे सरडे संपावर गेले असावेत.

कोल्हेंच्या या तिरकस टीकेला उत्तर देताना आढळराव म्हणाले, कोल्हे मला आणि मतदारांना आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवत आहेत. म्हणून मी प्रतिउत्तर देणार नव्हतो. पण मी जर सरड्यासारखा रंग बदलला असता तर कोल्हेंना हे सडेतोड उत्तर मी दिले असते का?

Related Posts