IMPIMP

Anganwadi Poshan Aahar | शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या आणि उंदराची विष्टा; मुलांच्या जीवाशी खेळ

by sachinsitapure

पुणे : Anganwadi Poshan Aahar | शालेय पोषण आहार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. लहान मुलांना अंगणवाडीमध्ये दिलेल्या पोषण आहारात उंदराची विष्टा आणि अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील जनता वसाहतीत समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारचा पोषण आहार देऊन सरकार मुलांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. याअगोदरही पुण्यात शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या कडधान्यात किडे आणि अळ्या असल्याचा प्रकार स्थानिकांनी समोर आणला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यात उंदरांची विष्ठा आणि अळ्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या कडधान्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या.

हा सर्वप्रकार पुण्यातल्या जनता वसाहतमध्ये घडला आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी हा सर्वप्रकार उघडकीस आणला. सरकार लहान मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप सध्या पान आळीमधील नागरिक करत आहेत. पोषण आहारामध्ये अळ्या आणि उंदरांच्या लेंड्या आढळल्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Related Posts