IMPIMP

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

by omkar

शिक्रापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) पोलीस कोठडीत असताना आता पुन्हा त्यांच्यासह दोन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगलदास विठ्ठल बांदल, गुलाब दशरथ पवार (दोघे रा. शिक्रापूर) व दिनेश जयसिंग कामठे (रा. जातेगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

शिक्रापूर पोलीसांनी बांदल यांना यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यात अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असताना, आता जातेगाव बुद्रुक येथील रवींद्र सातपुते यांना शिवाजीराव भोसले बॅंकेबाबत काहीही माहिती नसताना मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) , गुलाब पवार व दिनेश कामठे यांनी सातपुते यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रांचा वापर करून सातपुते यांच्या खोट्या सह्या करून बॅंकेचे कर्ज काढले.

मात्र, कर्ज काढल्यानंतर अनेक दिवसांनी सातपुते यांना माहिती झाले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने व शिक्रापूर पोलीसांनी कोणाची फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन केले असल्याने, सातपुते यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत. (Mangaldas Bandal)

Also Read:- 

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये प्रियकराच्या मदतीनं तिनं केली नवर्‍याची हत्या, स्वयंपाक घरात पुरलेल्या मृतदेहाचं ‘गौडबंगाल’ 6 वर्षाच्या मुलीनं सांगितलं

Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

पुण्यातील देहुरोडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कार

जाणून घ्या 3 जूनचे राशिफळ

अ‍ॅलोपॅथीनंतरआता बाबा रामदेव यांचा ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

Related Posts