IMPIMP

Builder Vishal Agrwal Arrest | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघातानंतर बिल्डर विशाल अग्रवालने पोलिसांना दिला होता असा गुंगारा

by sachinsitapure

पुणे :  – Builder Vishal Agrwal Arrest | पुण्यातील आलिशान भरधाव वेगात असलेल्या पोर्शे कारनं (Porsche Car Accident Pune) दोन इंजिनअर तरुण-तरुणींना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला (Pune Kalyani Nagar Accident). याप्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. आपल्या अल्पवयीन मुलाच्या कृत्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी बिल्डर विशाल अग्रवाल त्यांना गुंगारा देत राहिला. मात्र पोलिसांनीही लपत छपत फिरणाऱ्या विशाल अग्रवालला मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून बेड्या ठोकल्या. दरम्यान, नेमकं काय झालं? फरार काळात बिल्डर विशाल अग्रवाल नेमका होता कुठे? तर विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका लहान लॉजमध्ये लपला होता.

आपल्या अल्पवयीन मुलाच्या कृत्यानंतर विशाल अग्रवालला जाणीव झाली की आता आपल्याला अटक होणार आहे. त्यानंतर तो पहिल्यांदा पुण्यातील आपल्या फार्म हाऊसवर गेला. त्यानंतर तेथून कोल्हापूरला गेला. तिथे तो आपल्या एका मित्राला भेटला. त्यानंतर त्याने आपल्या एका चालकाला मुंबईला पाठवलं. कारण पोलिसांना असं वाटायला हवं की तो कोल्हापूरला गेला तिथून मुंबईला गेला.

परंतु प्रत्यक्षात विशाल अग्रवालने कोल्हापुरातून मित्राच्या कारने छत्रपती संभाजीनगर गाठलं. आपला ठावठिकाणा कोणालाही लागू नये, यासाठी त्याने आपल्या कुटुंबियांना देखील चुकीची माहिती दिली. त्यानं आपण मुंबईला चाललो असल्याचं आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यानं आपल्या मोबाईल स्विच ऑफ केला. त्यानंतर त्याने संपर्कासाठी नवं सीमकार्डही विकत घेतलं.

दरम्यान, पुणे पोलिसांनी विशालच्या मित्राच्या कारचा जीपीएसमुळे त्याच्या हालचाली समल्या. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र हालवत सीसीटीव्ही तपासले. तसेच विशालने आपल्या घरच्यांना मेसेज केला होता त्या मोबाईलचे लोकेशन तपासलं. त्यावेळी विशाल संभाजीनगर येथील एका लहान लॉजमध्ये लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) मंगळवारी सकाळी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Maharashtra 12th HSC Results 2024 | 12 वी च्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी, एकुण निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल

Related Posts