IMPIMP

Burglary in Pune | फिरायला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 90 लाखांचा ऐवज लंपास

by nagesh
Pune Crime | 22 years old boy wears undergarments of house owner woman and makes photo session, makes obscene gestures by speaking in dirty voice, molestation case registered in wanwadi police station

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Burglary in Pune | कुटुंबासह बाहेरगावी फिरायला गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी (Theft) बंगल्यात घरफोडी करुन तब्बल 155 तोळे सोन्याचे दागिने (Gold jewelry) चोरुन नेले. ही घटना पुण्यातील फुरसुंगी परिसरात गुरुवारी (दि.19) उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंगल्याचे कुलुप तोडून घरातील 155 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 88 लाख 38 हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरुन (Burglary in Pune) नेला, हा प्रकार 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विवेक वसंतराव चोरघडे (वय-47 रा. शेवाळवाडी फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरघडे यांचा शेती व्यवसाय असून ते 9 ऑगस्ट रोजी कुटुंबासमवेत बाहेर गावी फिरायला गेले होते.
गुरुवारी (दि.19) दुपारी साडेबारा वाजता ते घरी आले असता त्यांना बंगल्याचे दार उघडे दिसले.

चोरघडे यांनी बंगल्यातील प्रत्येक खोलीत जाऊन पाहणी केली असता खोलीतील कपाट फोडल्याचे दिसले. तसेच त्यातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.
चोरट्यांनी कपाटातील लॉकर फोडून सोन्याचे दागिने, चांदी, रोख रक्कम चोरुन नेली.
बंगल्यात चोरी झाल्याचे लक्षात येताच चोरघडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, चोरघडे कुटुंब नऊ दिवसांच्या कालावधीसाठी बाहेर गावी फिरायला गेले होते. या बंगल्याच्या आसपास वस्ती नसल्याने याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.
चोरट्यांनी बंगल्यातून 155 तोळे सोन्याचे दागिने, रुबी (Ruby), निलम डायमंड, वीस किलो चांदीची (Silver) भांडी, परदेशी चलन (Foreign Currency) मध्ये यूएस डॉलर, युरो, दिनार असे परदेशी चलन व रोख रक्कम असा एकूण 88 लाख 38 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे (Police Inspector (Crime) Digambar Shinde) करीत आहेत.

 

Web Title : Burglary in Pune | Thieves stolen Rs 90 lakh from hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune News | टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

OBC Lists | आता राज्यांना मिळाला OBC यादी बनवण्याचा अधिकार, राष्ट्रपती कोविंद यांनी दिली मंजूरी; आता विधेयक बनले कायदा

MP Amol Kolhe | दोन्ही डोस घेतल्यानंतरही खा. डॉ.अमोल कोल्हे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

 

Related Posts