IMPIMP

MP Amol Kolhe | दोन्ही डोस घेतल्यानंतरही खा. डॉ.अमोल कोल्हे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

by nagesh
mp amol kolhe tested covid 19 positive

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  कोरोनाचे दोन डोस (Corona Vaccine) घेतल्यानंतरही राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांना ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह (Report positive) आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचे मतदारसंघातील पूर्वनियोजित सर्व दौरे आणि कार्यक्रम पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार (Medical treatment) सुरु केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा, सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करुन घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे.

 

Web Title :  mp amol kolhe tested covid 19 positive

 

हे देखील वाचा :

Samruddhi Mahamarg Accident | दुर्देवी ! समृध्दी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेकराराने देण्यास स्थायी समितीची मान्यता; पुण्यातील संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Pune Crime | 6 KG वजनाची मूर्ती सोन्याची असल्याचे भासवून सराफाची फसवणूक; कात्रजमधील निलेश धुमाळ अटकेत

 

Related Posts