IMPIMP

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

by sachinsitapure

पुणे: CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) आणि अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाबाबत पोलिसांची (Pune Police) दिरंगाई आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त झाल्यांनतर पोलिसांनी या गुन्ह्याच्या संदर्भाने हालचाली सुरु केल्या. (Kalyani Nagar Accident)

पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून बिल्डर विशाल अगरवाल (Vishal Agrawal Arrest) यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar MLA) यांनी केला. तसेच पोलिसांनी यात पैसे खाऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचेही धंगेकर म्हणाले.

अपघातातील कार नेमके कोण चालवीत होते याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, ” सकाळी आठ वाजताच्या सुमारास कलमी ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास कलम ३०४ कलम जोडण्यात आले. पुढे बाल हक्क न्याय मंडळापुढे (Juvenile Justice Board – JJB) तो सज्ञान म्हणून गृहीत धरण्याची मागणी केली . सज्ञान करण्याबाबत एक प्रक्रिया असते त्याला वेळ लागतो. आम्ही आत पब मालक आणि मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला. ३०४ हा गुन्हा नोंद झाल्याने मुलाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. आरोपीला सज्ञान मानावे याबाबतची प्रक्रिया झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणातील इतर आरोपींना अटक केल्याचेही आयुक्त म्हणाले. या प्रकरणात पुरावे नष्ट केले आहेत का ? याचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. “ब्लड रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नसून ब्लड रिपोर्ट दोनदा घेण्यात आला आहे. दोन्हीचे डीएनए (DNA) एकच आहे का याचा शोध घेतला जात आहे. पोर्श कार आरोपी मुलगा चालवत होता. यासाठीचे तांत्रिक पुरावे एकत्र केले आहेत. पुराव्याच्या आधारावर आरोपी मुलगाच गाडी चालवत होता त्याला होणाऱ्या कृत्याची कल्पना होती ” असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; सहा ते सात कामगार गंभीर जखमी (Videos)

Related Posts