IMPIMP

Devendra Fadnavis In Shirur Lok Sabha | आढळराव केवळ उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत, ते शिवसेनेचेच, स्वत: फडणवीसांनी सांगितले ‘ते’ सत्य, अमोल कोल्हेंना म्हणाले ‘नाटकी माणूस’

by sachinsitapure
Sharad Pawar - Supriya Sule

पुणे : Devendra Fadnavis In Shirur Lok Sabha | शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यावर आरोप केला जातो की पक्ष बदलला. मात्र आज तुम्हाला मी सत्य सांगतो, मी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र बसलो. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. शिवसेनेचाही आग्रह होता. शेवटी मधला मार्ग काढला सीट राष्ट्रवादीच्या कोट्यात असली तरीही उमेदवार आढळराव पाटील यांनाच करु. दोन्ही पक्षांना समाधान वाटेल. आम्ही तिघेही एकाच विचाराने बरोबर आलो आहोत, असे म्हणत भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढळरावांच्या पक्ष बदलण्याबाबत स्पष्टीकरण दिले. ते शिरुर येथील सभेत बोलत होते.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांना लोकसभा निवडणुकीत चारच जागा मिळाल्या, असे म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात तीनच जागा मिळाल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. कारण, आढळराव हे केवळ उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत आले आहेत, ते शिवसेनेचेच आहेत, असेच अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न आज देवेंद्र फडणवीस यांनी शिरुरच्या सभेत केला.

या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी अमोल कोल्हेंचा उल्लेख नाटकी माणूस असा केला. फडणवीस म्हणाले, आढळराव पाटील यांनी मागच्या पंधरा वर्षांत किती प्रश्न विचारलेत तुम्ही रेकॉर्ड बघा. बैलगाडा शर्यत बंद झाली होती अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते त्यांनी काहीही केले नाही. आपले सरकार परत आले आणि आपण बैलगाडा शर्यत सुरु केली. त्यामागेही आढळराव पाटील यांचेच प्रयत्न होते.

अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जे आमच्यावर टीका करत असतील तर जरा त्यांनी समोरच्या उमेदवाराला विचारा की त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या. गेल्या पाच वर्षांत किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि कुठे जाणार होते आणि कसे थांबले ते आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा उघड होईल.

मात्र आढळरावांपेक्षा एक गोष्ट त्यांना चांगली जमते. आढळराव नाटक करत नाहीत. ते एवढे नाटकी आहेत की त्यांना रडता येते, हसता येते, जुमलेबाजी करता येते, बोलता येते. पण एक लक्षात ठेवा, लोक नाटकाचे तिकिट घेऊन एकदा नाटक बघायला जातात. पण नाटक फ्लॉप असेल तर कुणीही नाटक बघायला परत जात नाही. शिरुरच्या जनतेने एकदा तिकिट घेतले होते.

फडणवीस म्हणाले, शिरुरचे लोक खूप हुशार आहेत. पाच वर्षे ते फिरकले नाहीत. आता गावोगावी जात आहेत. पण शिरुरचे लोक त्यांना विरोध वगैरे करत नाहीत. शिव्याही देत नाही, बोलवतात, स्वागत करतात, हार घालतात आणि सत्कार करतात. समोरच्याला वाटते वा काय स्वागत झाले माझे. पण सत्कार झाल्यावर विचारतात पाच वर्षे कुठे होते तुम्ही? जबरदस्त लोक आहात तुम्ही सगळे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Related Posts