IMPIMP

FC Road Pune Crime News | पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन? अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

by sachinsitapure

पुणे: FC Road Pune Crime News | पोलिसांच्या कारवाईत पुण्यात करोडो रुपयांचे ड्रग्स सापडले होते (Pune Drug Case). दरम्यान ड्रग्स प्रकरणात ससून हॉस्पिटलचेही (Sassoon Hospital) कनेक्शन समोर आले. त्यांनतरही अनेकदा ड्रग्स सापडल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत.

पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईचे आदेशही देण्यात आले होते. मात्र काही कालावधीनंतर पुन्हा ‘जैसे थे’ ची परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रमुख अशा फर्ग्युसन रस्त्यावरील L3 – Liquid Leisure Lounge मध्ये दारू, अमली पदार्थांचे सेवन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे दिसत आहे. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब, हॉटेल आणि बारवर पोलीस कारवाई सुरु झाली होती. हॉटेल्सला अल्पवयीन मुलांना दारू देण्यास बंदी घालण्यात आली होती.

तसेच दारूच्या दुकानातूनही २१ वर्षांखालील मुलांना दारूविक्री केली जात नव्हती. मात्र आता सरार्सपणे मुलांना ड्रग्स दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीला घेऊन पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Related Posts