IMPIMP

Hadapsar Pune Crime News | पुणे: मगरपट्टा भागात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 8 जणांवर FIR, दोघांना अटक

by sachinsitapure

पुणे :- Hadapsar Pune Crime News | हडपसर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले तर उर्वरित सहा जण पळून गेले. या प्रकरणी एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.30 जून) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा चौकातील (Magarpatta City Chowk) लोहीयानगर (Lohiya Nagar Pune) झोपडपट्टीत करण्यात आली. (Robbery Attempt)

ऋतिक महिन्द्र रणखांबे (वय-24), पियुष पोपट लोंढे (वय-20 दोघे रा. लोहियानगर, झोपडपट्टी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रेम बापू चंदनवाले (वय-19), रुपेश अशोक गोहीरे (वय-19), निशांत महादेव कांबळे (वय-18 तिघे रा. लोहियानगर, झोपडपट्टी, हडपसर), चेतन सोमनाथ शिरोळे (वय-29 रा. तरवडे वस्ती, वानवडी) यांच्यासह इतर दोघांवर आयपीसी 399, 402, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रशांत दिगंबर दुधाळ (वय-35) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Hadapsar Police Station)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, लोहीयानगर झोपडपट्टीमधील सार्वजनिक शौचालयाच्या वरिल खोलीत काही तरुण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन सहाजण पळून गेले. तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता मगरपट्टा चौक परिसरातुन रात्री जाणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन व रोकड चोरण्याच्या तसेच गांधी चौक परिसरातील दागिन्यांच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोड्याच्या साहित्यासह एकत्र येऊन दरोड्याची तयारी केल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts