IMPIMP

Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम !

by nagesh
Indrani Balan Foundation | Punit Balan Group, Wisdom Cricket Academy teams continue their winning streak !

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने (Punit Balan Group Sangha) आणि विस्डम क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. (Indrani Balan Foundation)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या हेरंब परब याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनित बालन ग्रुपने पुणे सीए संघाचा ३१ धावांनी पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. पुनित बालन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ८ गडी गमावून १२६ धावा जमविल्या. यामध्ये हेरंब परब याने ३१ धावा तर, धीरज मंत्री याने १८ धावांची खेळी केली. पुनित बालन ग्रुप संघाच्या गोलंदाजी समोर पुणे सीएचा डाव मर्यादित राहीला. हेरंब परब याने ११ धावात ४ गडी बाद करून पुणे सीएची फलंदाजी कापून काढली. दुसर्‍या बाजुने अक्षय दरेकर याने १४ धावात ३ गडी बाद करून योग्य साथ दिली. पुणे सीएचा डाव २० षटकामध्ये ९५ धावांवर मर्यादित राहीला. (Indrani Balan Foundation)

 

दुसर्‍या सामन्यात आयुष काब्रा याच्या भेदक गोलंदाजी जोरावर विस्डम क्रिकेट अकादमी संघाने आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव केला. आर्यन्स् क्रिकेट संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकामध्ये ६ गडी गमावून १३९ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये रिषी नाळे याने नाबाद ५९ धावांची खेळी केली. चिन्मय यादव याने २६ धावा करून फलंदाजीच्या जबाबदारी उचलली. आयुष काब्रा याने १४ धावात ३ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. तसेच सागर वाघमारे यानेही (३-३६) गोलंदाजीचा भार उचलला. विस्डम क्रिकेट अकादमीने हे आव्हान १९.२ षटकात व ८ गडी गमावून पूर्ण केले. प्रतिक खांडवे याने ५६ धावा करून फलंदाजीचा भार उचलला. प्रतिकला विवेक आन्ची याने २४ धावा करून सुरेख साथ दिली व संघाला विजय मिळवून दिला. (Indrani Balan Foundation)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरी

 

१) पुनित बालन ग्रुप: २० षटकात ८ गडी बाद १२६ धावा (हेरंब परब ३१ (२२, ३ चौकार, १ षटकार), धीरज मंत्री १८, आयुष तिवारी ३-३२, साहील पारख २-१५) वि.वि. पुणे सीए: २० षटकात ९ गडी बाद ९५ धावा (रूद्रांग जी. २५, सौरभ सोनी १८, हेरंब परभ ४-११, अक्षय दरेकर ३-१४); सामनावीरः हेरंब परब;

 

२) आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद १३९ धावा (रिषी नाळे नाबाद ५९ (४८, ३ चौकार, २ षटकार), चिन्मय यादव २६, आयुष काब्रा ३-१४, सागर वाघमारे ३-३६) पराभूत वि. विस्डम क्रिकेट अकादमीः १९.२ षटकात ८ गडी बाद १४३ धावा (प्रतिक खांडवे ५६ (४८, ६ चौकार, २ षटकार), विवेक आन्ची २४, हर्षल मिश्रा २-२३, युवराज शिंदे २-३७); सामनावीरः आयुष काब्रा;

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Indrani Balan Foundation | Punit Balan Group, Wisdom Cricket Academy teams continue their winning streak !

 

हे देखील वाचा :

Pune-Pimpri-Baramati Rickshaw Fare Hike | 22 नोव्हेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ ! पहिल्या दीड कि.मी.साठी 21 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 14 रुपये भाडेदर

CBI ची मोठी कारवाई ! इंजिनियर आणि त्याची पत्नी बनवत होते मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ

Pune Corporation | बाजीराव रस्त्यावरील पाईपलाईनचे काम पुर्णत्वाकडे ! बाजीराव रस्त्याकडेच्या पेठा आणि शिवाजीनगर गावठाणाला लवकरच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा

 

Related Posts