IMPIMP

Junner News | खोट्या शिवभक्त ‘अक्षय बोऱ्हाडे’वर पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

by nagesh
Junner News | immoral relationship with many girls wife accuses fake shivbhakat akshay borhade

जुन्नर : सरकारसत्ता ऑनलाइन Junner News | जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यभरातील अनेक अशा दीन-दलित, बेघर, गरीब, वेडसर लोकांना घरी आणून सरकारच्या मदती शिवाय सेवा करणारा व त्यांचा सांभाळ करणारा शिवऋण प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे (Akshay Borhade) याच्यावर जुन्नर पोलिसांनी (Junnar Police) खंडणी (Ransom) मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर, पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली. मुख्यता म्हणजे प्रकरणामध्ये आता त्याची पत्नी रुपाली बोऱ्हाडे (Rupali Borhade) देखील पुढं आल्या आहेत. त्याच्या पत्नीनेही अक्षयविरोधात तक्रार केल्याने त्याच्या अडचणीत वाढ (Junner News) दिसुन येते.

 

फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करुन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाईक आहे.
असा दिखावा करुन लाखो शिवभक्तांची सहानुभूती मिळवणाऱ्या शिवजन्मभूमीतल्या अक्षय बोऱ्हाडे (Akshay Borhade) या भामट्याचा जुन्नर पोलीसांनी पर्दाफाश केला आहे.
नाव छत्रपतींचं आणि कारभार मात्र तालिबान्यासारखा असाच काही प्रकार हा उघडकीस आला आहे.
दरम्यान, अक्षय बोऱ्हाडे याने जुन्नरचे माजी नगरसेवक रुपेश शहा (Rupesh Shah) यांच्याकडे काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारात अर्ज करून खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी
दिल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी (Junnar Police) ही कारवाई केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अक्षयच्या पत्नीने पती अक्षय मोहन बोऱ्हाडे, सासू सविता मोहन बोराडे आणि दीर अनिकेत मोहन बोराडे
या सर्वांवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्रास देऊन तसेच वेळोवेळी रिव्हॉलवरची व गुंडांची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे.
त्याचप्रमाणे स्वतः कोणतेही काम न करता शिवरून युवा प्रतिष्ठान या संस्थेसाठी आलेला निधी स्वतःच्या चैनीसाठी अपहार करून वेगवेगळ्या मुलींसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केला आहे.
अशी तक्रार त्याच्या पत्नीने दिलं आहे.

 

दरम्यान, अक्षय बोऱ्हाडेला जुन्नर कोर्टात (Junnar Court) हजर केले असता कोर्टोने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
परंतु, आता त्याची पत्नी सुद्धा पुढे आली असून अक्षयच्या अनेक गैर कारभाराचं आता बिंग फुटलं आहे. यावरुन त्याच्या पोलीस कोठडीत (Police cell) वाढ झाली आहे.

 

Web Title : Junner News | immoral relationship with many girls wife accuses fake shivbhakat akshay borhade

 

हे देखील वाचा :

Ahmednagar News | दुर्दैवी ! TV ची केबल जोडताना शॉक बसून तरुण गोळाफेकपटूचा मृत्यू

Mumbai Police | YouTube चॅनेलचा संचालक मुंबई पोलिसांच्या ताब्यात, 50 लाखांचे चरसही जप्त

Sanjay Raut | राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले – ‘आम्ही पाठीमागून नाही तर समोरून खंजीर खुपसतो’

 

Related Posts